पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ गीतारहस्य अथवा कर्मयोग करणें हें तुझें कर्तव्य होय, असेंच कीं नाहीं? दिसण्यांत हा उपदेश अतिशय सापा दिसतो; पण जरा खोलपाहूंलागलें म्हणजे त्यांतील अपुरेपणा व अडचणी समजतात. गुष्कळ म्हणजे किती? पांडवांच्या सात, तर कौरवांच्या अकरा अक्षौहिणी म्हणून पांडवांचा पराजय झाला असता तर या अकरा अक्षौहिणींस सुख झाले असते, या युक्तिवादानें पांडवांचा पक्ष अन्याय्य होता असे म्हणतां येईल काय: भारती युद्धाबद्दलचकाय, पण दुसच्या अनेक प्रसंगींनीतिमतेचा निर्णय केवळ संख्येवरून करणें चुकीचे आहे. लाखों दुर्जनांना सुख होईल त्यापक्षां एकाच कां होईना पण सज्जनाला ज्यामुळे संतोष होईल तेंच खरें सत्कृत्य होय, असें व्यवहारांत सर्व लोक समजतात, हा समज खरा ठरण्यास एका सज्जनाच्या सुखास लाख दुर्जनांच्या सुखापक्षां अधिक किमत द्यावी लागत्येः आणि तसें केलं म्हणजे, “पुष्कळांचे पुष्कळ बाह्य सुख” हेंच काय तें नीतिमतेच्या परीक्षेचे साधन होय, हा पहिला सिद्धान्त त्या मानानें लैंगडा पडतो. म्हणून लोकांची संख्या कमी किंवा जास्त असणें याचा नीतिमतेशों नित्यसंबंध असू शकत नाही, असें म्हणणें भाग पडतें. दुसरें असेंहि लक्षांत ठेविले पाहिजे की, सामान्यतः सर्व लोकांस कधी कधी जी गेोष्ट सुखावह वाटत्य तीच दूरदर्शी पुरुषास परिणामी सर्वाच्याच गैरफायद्याची आहे असे दिसत असतं. उदाहरणार्थ, सँीक्रेटिस व येशू ख्रिस्त यांचीच गोष्ट घ्या. दोघेहिं आपआपल्या मतें परिणामी कल्याणकारक असाच उपदेश आपल्या देशबंधूंस करीत होते. परंतु त्यांच्या देशबांधवांनी त्यास “समाजाचे शत्रू” ठरवून देहान्त प्रायश्चित दिले ! “ पुष्कळ लोकांचे पुष्कळ सुख” या तत्त्वावरचे लोक व पुढारी या दोघांनीहि या बाबतीत वर्तन केले होतें: पण या वेळचे सामान्य लोकांचे वर्तन न्याय्य होतें असें आपण आतां म्हणत नाही. सारांश, “ पुष्कळांचे पुष्कळ सुख ” हेंच काय तें एक नीतीचे मूलतत्त्व असें जरी क्षणभर कबूल केले, तरी लक्षावधि लोकांचे सुख कशांत आहे आणि तें ठरवावयाचे कस व कोणी, या प्रश्नांचा त्यानें कांहींच निकाल लागत नाही. सामान्य प्रसंगी हा निर्णय करण्याचे काम ज्या लोकांच्या सुखदुःखाबद्दल प्रश्न आहे त्या लोकांकडेसेंपवितां येईल. पण सामान्य प्रसंगी इतका खटाटोप करण्याचे कारण नसतें; आणि भानगडीच्या विशेष प्रसंगीं सामान्य जनांस आपले सुख कशांत आहे याचा बिनचूक विचार करण्याइतका पोंच नसल्यामुळे भुताच्या हातात कोलीत दिल्यानें जेो परिणाम व्हावयाचा तसाच “पुष्कळांचे पुष्कळ सुख”हें एकटेंच नीतितत्त्व या अनधिकारी लोकांच्या हातांत पडल्यानें होत असतो, हें वरील दोन्ही उदाहरणांवरून उघड होतें. “नीतिधर्माचे करणार!” या उत्तरांत कांहीं अर्थ नाही. कारण, तत्त्व जरी खरे असले तरी त्याचा