पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

«Y गीतारहस्य अथवा कर्मयोग वावर असें म्हणणें आह कीं, तात्त्विकदृष्टया परार्थ श्रेष्ठ असला तरी, परमावधीची झुद्ध नीति कोणती हें न पहातां सामान्य व्यवहारांत ‘सामान्य' मनुष्यांनीं कसें जें अग्रस्थान देतों तंच व्यावहारिकदृष्टया योग्य आह. ५. पण आमच्या मतें या कोटिक्रमांत कांहीं हांशील नाही. बाजारांत उपयोगांत येणारी वजनेंमापें नहर्माच थेोडीं कमीजास्त असतात, या सबबावर राजदरबारी सर्वास प्रमाणभूत म्हणून ठेवलेलीं वजनेंमार्पहेि जर होतील तितकी चोख न ठेविली, तर आपण त्याबद्दल अधिकाच्यांस दूषण देणार नाही काय? कूर्मयोगशास्रास हाच न्याय लागूं आहे. नीतिधर्माचे पूर्ण, शुद्ध व नित्य स्वरूप कोणतं याचा शास्त्रीय निश्चय करण्यासाठीच नीतिशास्राची प्रवृत्ति झालेली आह; आणि हें काम जर नीतिशास्त्र न करील तर तें निष्फळ म्हणावें लागेल. ‘शहाणा स्वार्थ’ हा सामान्य मनुष्याचा मार्ग आह असें जें सिज्विक म्हणतो तें कांहा खोटें नव्हे. भर्तृहरिहिं तेंच म्हणत अह. परंतु या सामान्य लोकांचेच पराकाछेच्या नीतिमतेबद्दल काय मत आहे याचा जर शोध केला, तर सिज्विक यानें शहाण्या स्वार्थास जें महत्त्व दिले आहतें चुकीचे असून निष्कलंक नीतीचा किंवा सत्पुरुषाच्या आचरणाचा मार्ग या सामान्य पोटभरू मार्गाहून भिन्न आहे, असें सामान्य लोकहि समजतात असें दिसून येईल; व हाच अर्थ वरील लोकांत भर्तृहरांनें वर्णिला आहे. निव्वळ स्वार्थी, दूरदर्शी स्वार्थी वउभयवादी किवा शहूणे स्वार्थी, याप्रमाणें आधिभौतिकसुखवाद्यांचे जे तीन मार्ग आहत त्यांचा आतांपर्यंत विचार करून त्यांतील मुख्य दोष कोणतेते सांगितले. पण एवढ्यानेंच सर्व आधिभौतिक पंथ संपत नाहीत. यापुढला आणि सर्व आधिभौतिक पंथांत श्रेष्ठपंथ म्हटला म्हणजे “एकाच मनुष्याच्या सुखाकडे न पहातां सर्व मनुष्यजातीच्या आधिभौतिक सुखदुःखांचे तारतम्य पाहूनचनैतिक कार्यकार्याचा निर्णयकेला पाहिजे,” असें प्रतिपादन करणाच्या सात्त्विक आधिभौतिक पंडितांचा होय. एकाच कृत्यानें एकाच वेळी समाजांतील किंवा जगांतील सर्व पुरुषांस सुख होणे शक्य नसतें. कोणास एखादी गोष्ट सुखकारक वाटली तर तीच दुसन्यास दुःखकारक असत्ये. परंतु घुबडास उजेड आवडत 3 Sidgwick's Methods of Ethics, Book I Chap,IIš2, pp 18.29; also Book IV. Chap IV $ 3 p 474, as for dù ठेवकनें काढिला आहे असें नाहीं; तर सामान्य सुशिक्षित इंग्रज़लोक प्रायः याच पंथाचे अनुयायी असून RITE Common sense morality soft afa smo. बॅर्थम, मिल्ल वगैरे ifa at #41* Reāā sista. Greatest good of the greatest number याचे “पुष्कळांचे पुष्कळ सुख' असें आम्हीं भाषांतर केलें आहे.