पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आघिभैतेिक सुखवाद ૮ ફે ण्याची पंचाईतपडून पुष्कळदां स्वार्थाकडेच मनुष्य ओढला जाण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ, स्वाथै आणि परार्थ दोन्ही सारखेच प्रबल मानिल्यास सत्याकरितां प्राण देणे किंवा राज्य गमाविणें दूरच, पण द्रव्यद्वारा बरेंचसें नुकसान होत असलें तर तें सहन करावें कीं नाहीं, याचा या पंथांतील मतानें निर्णय होत नाहीं. एखाद्या उदार पुरुषानें परार्थीसाठी आपले प्राण दिल्यास या पैथांतील लोक कदाचित् त्याची स्तुति करतील; पण स्वतःवर तसा प्रसंग आल्यास स्वार्थ व परार्थ या दोन दगडींवर नहमीं हात ठेवणाच्या या पंडितांचा ओढा स्वार्थाकडेच अधिक वळेल हें सांगावयास नको. हॉब्सप्रमाणें परार्थ हा स्वार्थाचाच दूरदर्शी प्रकार न मानितां, स्वार्थ आणि परार्थ असे दोन्ही तागडींत घालून त्यांच्या तारतम्यानें आम्ही आपला स्वाथ मोठ्या चातुर्यानें ठरवितों असें समजून या पंथांतील लोक आपल्या मागीस ‘उदात्त' किंवा ‘शहाणा’ स्वार्थ (पण कांहीं झाले तरी स्वार्थच !) असें नांव देऊन त्याची महती गात असतात. * पू भर्तृहरि काय म्हूणती पहा--- एके सत्पुरुषाः परार्थवटकाः स्वार्थान् पूरित्य्ज्य ये सुमान्यास्तु परार्थमुद्यूमभ्रुतः स्वूार्थाऽविरृधेन् ये । तेऽमी मानवशॆक्षसाः ऐरह्रिते स्घाथोय निध्नन्ति ये। ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ॥ “आपला फायदा सोडून देऊन जे लोकांचे कल्याण करितात तेच खरे सत्पुरुष म्हणावयाचे ! स्वार्थ न सोडितां लोकांसाठी झटणारे पुरुष सामान्य होत; आणैि आपल्या फायद्यासाठी लोकांचे नुकसान करणारे पुरुष मनुष्यें नसून राक्षस समजले पाहिजेत ! परंतु यापलीकडल्या म्हणजे लोकहिताचा निरर्थक नाश करणाच्या पुरुषांस काय नांव द्यावेंतें आम्हांस कळत नाहीं !” (नी. श. ७४). तसेंच राजधमीचा उत्तम स्थिति वर्णन करितांना कालिदासानेंहि स्वसुखनिरभिलषः खिद्यसे लेकिद्देतोः । प्रतिदिनमथवा ते वृत्तिरवंविधैव ॥ “आपल्या सुखाची पर्वा न करितां तूं दररोज लोकहितार्थ कष्ट करितीस ! अथवा तुझी वृति किंवा धेदाच असा आह,”-असें म्हटले आहे (शाकुं. ५.७). कर्मयोगशास्रांत स्वार्थ आणि परार्थ हीं दोन्ही तत्त्वें स्वीकारून त्यांच्या तारतम्यानें धर्माधर्माचा किंवा कर्माकर्माचा निर्णय कसा करावा, हें भर्तृहरी किंवा कालिदास यांस पहावयाचे नव्हतें; तथापि परार्थासाठीं स्वार्थ सोडणाच्या पुरुषांना त्यांनी जें पहिले स्थान दिले आहे, तेंच नीतिदृष्टयाहि न्याय्य आहे. या पैंथांतील लोकांचें

  • #f5ffti ziren enlightened self-interest stě Ferrāri. Effenlightened याचे भाषांतर आम्हीं ‘उदात्त' किंवा ‘शहाणा' या पदानें केले आहे. *