पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

く* गीतारहस्य अथवा कर्मयोग देतो, व सर्व परार्थ दूरदर्शी स्वार्थ मानून, स्वार्थाखेरीज या जगांत दुसरें कांहीं नाहीं असं म्हणतो; आणि याज्ञवल्क्य ‘स्वार्थ’ या शब्दांतील ‘स्व'(आपला) या पदाच्या आधारें अध्यात्मदृष्टया आपल्या एका आत्म्यांतच सर्व भूतांचा व सर्व भूतांतच आपल्या आत्म्याचा आविरोधानें कसा समावेश होतो हें दाखवून स्वार्थ व परार्थ यांच्या दरम्यान भासणा-या द्वैताचे बंडच समूळ मोडून टाकितो. संन्यासमार्गाच्या आणि याज्ञवल्क्याच्या वरील मताचा जास्त विचार पुढे करण्यांत येईल. “ सामान्य मनुध्यांची प्रवृत्ति स्वार्थपर म्हणजे आत्मसुखपर असत्ये,” या एका गोष्टीचे कमी आधिक गौरव करून किंवा तीच सर्वस्वीं निरपवाद आहे असे समजून आमच्याकडील प्राचीन ग्रंथकारांनी त्यापासूनच हॉब्सच्या उलट दुसरी अनुमानें कशों काढिली ఫి ईसाक्षसाचा याज्ञवल्क्याादकांच्या मतांचा या ठिकाणीं उल्लेख इंग्रज ग्रंथकार हॉब्स व फ्रेंच पंडितहेल्वशिअस यांनीं प्रतिपादन केल्याप्रमाणे मनुष्यस्वभाव केवळ स्वार्थपर म्हणजे तमोगुणी किंवा राक्षसी नसून स्वार्थाबरोबरच परोपकारबुद्धीची सात्त्विक मनोवृत्तिहि मनुष्याच्या अंगों उपजतचस्वतंत्र निमीण झालेली आहे, परोपकार म्हणजे केवळ दूरदर्शी स्वार्थ नव्हे, असें सिद्ध झाल्यावर स्वार्थ म्हणजे स्वसुख आणि परार्थ म्हणजे दुस-याचे सुख या दोन्ही तत्त्वांवर सारखी दृष्टि ठेवून कार्याकार्यव्यवस्थितिशास्राची रचना करणें प्राप्त होतें. आधिभौतिकवाद्यांचा हा तिसरा वगै होय. तथापि स्वार्थ काय आणि परार्थ काय, दोन्हीहि ऐहिकसुखवाचक होत, ऐहिक सुखापलीकडे कांहीं नाही, हें आधिभौतिक मत या पक्षांतहि कायमच रहातें.भद इतकाच कीं, स्वार्थबुद्धीप्रमाणे परार्थबुद्धिहि नैसर्गिक मानिल्यामुळे नीतीचा विचार करितांना स्वार्थाप्रमाणेंच परार्थहि पहाणें आपले कर्तव्य आहे असें या पंथांतील लीक समजतात. सामान्यतः स्वार्थ आणि परार्थ यांच्यामध्यें विरोध उत्पन्न होत नसल्यामुळे मनुष्य जीं जीं कर्मे करितो ती ती प्रायः समाजाच्याहि हिताची असतात. एकानें द्रव्यसंचय केला तर त्यांत एकंदर समाजाचेहि हितच होतें, कारण, समाज म्हणजे अनेक व्यक्तींचा समूह असल्यामुळे त्यांतील • प्रत्येक व्यक्ति दुस-याचे नुकसान न करितां जर आपला फायदा करून घेऊंलागली तर एकंदर समाजाचे त्यांत कल्याणच आहे. यासाठी आपल्या सुखाकडे दुर्लक्ष न कारतां एखाद्यास जर लेोकहित करितां आले तर तसे करणें हें त्याचे कर्तव्य होय, असें या पंथांतील लोकांनीं ठरविले आहे. पण या पक्षांतील लोक परा कंबूल न करितां दर वेळी आपल्या बुद्धीप्रमाणे स्वार्थ श्रेष्ठ का परार्थ श्रेष्ठ चिचार करण्यास सांगत असल्यामुळे, स्वार्थ आणि परार्थ यांच्यामध्यें जेव्हां रोध मतेा तेव्हां लोकांच्या सुखासाठी आपले सुख किती सोडावें याचा निर्णय श्रेष्ठत्व § याचा !