पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
विषयप्रवेश

अग्निपुराणाच्या तिसऱ्या खंडाच्या ३८० व्या अध्यायात, आणि गरुडपुराणाच्या पूर्वखंडाच्या २४२ व्या अध्यायात दिले आहे. तसेच योगवासिष्ठ हा ग्रंथ यद्यपि रामावतारांत वसिष्ठांनी रामास सांगितला आहे असे म्हटले आहे, तरी त्यातच 'अर्जुनोपाख्यान' या नावाने कृष्णावतारी भगवंतांनी अर्जुनास सांगितलेल्या भगवद्गीतेचे[टंकनभेद] सार, भगवद्गीतेतील[टंकनभेद] अनेक श्लोक[टंकनभेद] जसेच्या तसेच घेऊन, शेवटच्या म्हणजे निर्वाण प्रकरणात गोवलेले आहेत (योग. ५ पू. सर्ग. ५२-५८ पहा). पुण्यास छापिलेल्या पद्मपुराणात शिवगीता मिळत नाही असे वर सांगितलेले आहे; परंतु शिवगीता न मिळाली तरी या प्रतीच्या उत्तरखंडातील अध्याय १७१ ये १८८ पर्यंत भगवद्गीतामाहात्म्य[टंकनभेद] वर्णिले असून, भगवद्गीतेतील[टंकनभेद] प्रत्येक अध्यायाला या महात्म्याचा एकेक अध्याय दिला आहे व त्यांत यासंबंधीच्या कथाहि आलेल्या आहेत. याखेरीज वराहपुराणात एक गीतामाहात्म्य असून शैव किंवा वायुपुराण यातहि तिसरे एक गीतामाहात्म्य सांगितले आहे असे म्हणतात. पण कलकत्त्यास छापिलेल्या वायुपुराणात आम्हांस ते मिळाले नाही. 'गीताध्यान' म्हणून एक नऊ श्लोकी[टंकनभेद] प्रकरण भगवद्गीतेच्या[टंकनभेद] छापील प्रतींत आरंभी दिलेले असते. हे कोठून घेतलेले आहे ते कळत नाही. पण यांपैकी "भीष्मद्रोणतटा जयद्रथजला॰" हा श्लोक[टंकनभेद] थोड्या शब्दभेदने अलिकडे प्रसिद्ध झालेल्या भास कवीच्या 'उरूभंग' नांवाच्या नाटकात आरंभीच दिला आहे. म्हणून हे ध्यान प्रायः भास कवीच्या प्रचारात आले असावे असे दिसते. कारण, भासासारख्या प्रसिद्ध कवीने हा श्लोक[टंकनभेद] गीताध्यानातून उचलला आहे असे मानण्यापेक्षा गीताध्यान हेच निरनिराळ्या[टंकनभेद] ठिकाणचे श्लोक[टंकनभेद] घेऊन व काही नवीन रचून बनविलेले आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक होय. भास कवि हा कालिदासापूर्वीचा असल्यामुळे त्याचा काल निदानपक्षी शके तीनशेहून अधिक अर्वाचीन होऊ शकत नाही.[१]

वरील हकीकतीवरून भगवद्गीतेचे [टंकनभेद] कोणकोणते व किती अनुवाद, उण्यापुऱ्या नकला, तात्पर्ये किंवा माहात्म्ये पुराणांतून आढळून येतात हे लक्षात येईल. अवधूत, अष्टावक्र वगैरे काही गीता कोणत्या पुराणांतील आहेत, अथवा पुराणांतील नसल्यास त्या स्वतंत्ररीत्या केव्हा व कोणी रचिल्या याचा पत्ता लागत नाही. तथापि या सर्व गीतांची रचना किंवा त्यांतील विषयाची जुळणी पहिली तर हे सर्व ग्रंथ भगवद्गीता[टंकनभेद] प्रसिद्धीस येउन ती लोकमान्य झाल्यानंतर रचिले गेले असावेत असे दिसून येते. किंबहुना भगवद्गीतेसारखी[टंकनभेद] एखादी गीता आपल्या विशिष्ट पंथांत अगर पुराणांत असल्याखेरीज त्याची पूर्तता होत नाही एवढ्याच समजुतीने या निरनिराळ्या गीता

  1. वरीलपैकी बहुतेक व दुसऱ्याहि कित्येक गीता (भगवद्गीतेसह[टंकनभेद]) रा. रा. हरि रघुनाथ भागवत हे हल्ली छापून काढीत आहेत.