पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग

निर्माण झाल्या आहेत, असे म्हटलें तरी चालेल. भगवद्गीतेंत[टंकनभेद] ज्याप्रमाणें भगवंतांनी अर्जुनास विश्वरूप[टंकनभेद] दाखवून ज्ञान सांगितलें तसेंच शिवगीता, देवगीता, गणेशगीता यांत वर्णन आहे; आणि शिवगीता, ईश्वरगीता वगैरेमधून भगवद्गीतेचे[टंकनभेद] बरेचसे श्लोक[टंकनभेद] अक्षरशः आलेले आहेत. ज्ञानदृष्ट्या पहिलें तर भगवद्गीतेपेक्षां[टंकनभेद] या गीतांतून कांही विशेष नसून अध्यात्मज्ञान व कर्म यांची जोड भगवद्गीतेची[टंकनभेद] जी अपूर्व शैली ती तर यांपैकी कोणत्याही गीतेंत आढळून येत नाही. भगवद्गीतेंत[टंकनभेद] पातंजलयोग किंवा हठयोग आणि कर्मत्यागरूप संन्यास यांचे यावें तसें वर्णन आलें नाही, असें कोणास तरी वाटून त्यानें कृष्णार्जुनांच्या संवादरूपानें भगवद्गीतेची[टंकनभेद] पुरवणी म्हणून उत्तरगीता मागाहून रचिलेली आहे; आणि अवधूत, अष्टावक्र वगैरे कांही गीता निव्वळ एकदेशीय म्हणजे संन्यासमार्गाचेंच प्रतिपादन करणाऱ्या असून यमगीता, पांडवगीता वगैरे दुसऱ्या कांही गीता स्तोत्रासारख्या अगदी संक्षिप्त व भक्तीपर आहेत. शिवगीता, गणेशगीता व सुर्यगीता यांचा प्रकार तसा नसून त्यांतून ज्ञानकर्मसमुच्चयाचें सयुक्तिक समर्थन केलें आहे हें खरें; तथापि त्यांतील प्रतिपादन बहुतेक भगवद्गीतेवरूनच[टंकनभेद]घेतलेलें असल्यामुळे त्यांत कांही नवेपणा वाटत नाही. म्हणून अखेर भगवद्गीतेच्या[टंकनभेद] प्रगल्भ व व्यापक तेजापुढें मागाहून झालेल्या या पौराणिक शिळ्या गीतांचा टिकाव न लागतां, उलट भगवद्गीतेचीच[टंकनभेद] महती या नकली गीतांनी अधिक व्यक्त व स्थापित झाली; आणि 'गीता' या शब्दाचाच 'भगवद्गीता[टंकनभेद]' असा अर्थ प्राधान्येंकरून रूढ झाला. अध्यात्मरामायण व योगवासिष्ठ हे ग्रंथ विस्तृत असले तरी ते मागाहूनचे होत हे त्यांच्या रचनेवरूनच उघड होतें. मद्रासेकडील 'गुरुज्ञानवासिष्ठ-तत्त्वसारायण' हा ग्रंथ कित्येकांच्या मतें फार प्राचीन आहे; पण आम्हास तसें वाटत नाही. कारण, त्यांत एकशेंआठ उपनिषदांचा उल्लेख असून तीं सर्व प्राचीन आहेत असें मानितां येत नाही; आणि सुर्यगीता पहिली तर तिच्यांत विशिष्टाद्वैती मताचा उल्लेख सांपडतो (३.३०), व कांही ठिकाणचा कोटिक्रमहि भगवद्गीतेवरूनच[टंकनभेद] घेतल्यासारखा दिसतो (१.६८). म्हणून हा ग्रंथहि पुष्कळ मागाहून-किंबहुना श्री शंकराचार्यांच्याहि मागाहून-झाला[खात्रीचेटंकन?] असावा असें म्हणणें प्राप्त होतें.

गीता पुष्कळ असल्या तरी भगवद्गीतेचें[टंकनभेद] श्रेष्ठत्व याप्रमाणे निर्विवाद असल्यामुळें इतर गीतांकडे फारसे लक्ष न देतां भगवद्गीचें[टंकनभेद] परीक्षण करून त्यांतील तात्पर्य आपल्या धर्मबंधूंस सांगणें यांतच उत्तरकालीन वैदिकधर्मीय पंडित आपला कृतकृत्यता मानूं लागले. ग्रंथाचें परीक्षण दोन प्रकारचें असते; एक अंतरंगपरीक्षण व दुसरे बहिरंगपरीक्षण. समग्र ग्रंथ अवलोकन करून त्यांतील मर्म, रहस्य, मतितार्थ किंवा प्रमेय काढणें यास 'अंतरंगपरीक्षण' हें नांव असून, ग्रंथ कोठें व कोणीं केला, त्याचां भाषा