पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंह्रारः ४९.९ योगाची तत्त्वें समजून देण्याचीजव्हां जरूर वाटू लागली तेव्हां शांडिल्यसूत्रे किंवा ब्रह्मसूत्रभाष्यें यांऐवजीं महाभारताचीं गद्यात्मक भाषांतरें होऊन बखरीच्या रूपानं त्यांचा अभ्यास सुरूंझाला ही भाषांतरें तैजावर येथील पुस्तकालयांत अद्याप ठेविलेली आहेत. हाच क्रम जर पुढे अबाधित चालू असता तर गीतेवरील एकदेशीय टीका मार्गे पडून महाभारतांतील सर्व नीतीचे सार गीताधर्मातल्या कर्मयोगांत वर्णिले आहे ही गेोष्ट कालमानाप्रमाणें पुनः सर्व लोकांच्या लक्षांत आल्याखेरीज राहिली नसती. परंतु कर्मयोगाचें हें पुनरुजीवन आमच्या दुर्दैवानें फार दिवस टिकलें नाही. असो; हिंदुस्थानच्या धार्मिक इतिहासाचे विवेचन करण्याचे हें स्थल नव्हे. गीतेंतील धर्मात एक प्रकारचा जिवंतपणा, तेज किंवा सामथ्र्य असून मध्यंतरीं दैववशात् संन्यासधर्माची जी उचल झाली तिनें देखील हें सामथ्यै नाहीसें झाले नाहीं एवढें वरील संक्षिप्त व त्रोटक हकीकतीवरून वाचकांच्या लक्षांत येईल. “धारणाद्धर्मः” असा धर्म शब्दाचा धात्वर्थे असून सामान्यतः त्याचे ‘पारलौकिक' व ‘व्यावहारिक,’ किंवा ‘मोक्षधर्म’ आणि ‘नीतिधर्म’ असे दोन भेद होतात हें आम्ही तिसच्या प्रकरणांत सांगितले आहे. वैदिक धर्म घ्या, बुद्धाचा घ्या किंवा ख्रिस्ताचा घ्या, जगाचे धारणपोषण होऊन मनुष्याला अखेर सद्गति मिळावी हाच सर्वोचा मुख्य हेतु असल्यामुळे मोक्षधर्माबरोबरच व्यावहारिक धमाधर्माचेहि या प्रत्येक धर्मात थोडेंबहुत विवेचन आले आहे किंबहुना प्राचीन काळी मोक्षधर्म निराळा व व्यावहारिक धर्म निराळा हा भेदच करीत नसत असें म्हटलें तरी चालेल; कारण, परलोकीं सद्गति मिळण्यास या जगांतील आचरणहि शुद्धच असलें पाहिजे अशा सर्वांची पुरी समजूत होती. इतकंच नव्हे तर गीतेंत सांगितल्याप्रमाणें पारलौकिक व ऐहिक कल्याणाचा पायाहि एकच आहे असें ते मानीत असत. परंतु आधिभौतिक ज्ञानाच्या प्रसारानें सध्यांचे काळीं पाश्चिमात्य देशांत ही समजूत कायम न रहातां मोक्षधर्माशिवाय नीतीची, म्हणजे ज्या नियमांनीं जगाचे धारणपोषण होतें त्या नियमांची, उपपति सांगतां येईल कीं नाहीं, हा विचार सुरू होऊन केवळ आधिभौतिक म्हणजे दृश्य किंवा व्यक्त पायावरच समाजधारणाशास्र रचण्यास प्रारंभ झाला आहे. तथापि नुस्त्या व्यक्तानें मनुष्याचा निर्वाह कसा लागणार ? झाड, मनुष्य हे जातिवाचक शब्द देखील अव्यक्त अर्थच दाखवितात. अांब्यांचे झाड, गुलाबाचे झाड, ही विशिष्ट वस्तु दृश्य आह खरी, परंतु झाड हा सामान्य शब्द कोणतीहि दृश्य किंवा व्यक्त वस्तु दाखवीत नाहीं; आणि याच होण्यास प्रथम कांहीं तरी व्यक्त वस्तु डोळ्यापुढे पाहिजे हें यावरून उघड होतें; पण