पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o o गीतारहस्य अथवा कर्मयेोग ه؟ व्यक्त हीच अखेरची पायरी नसून अव्यक्ताच्या आश्रयाखेरीज एक पाऊलहेि अापणांस पुढे टाकेितां येत नाहीं, किंवा एक वाक्यहि पुरेंकरितां येत नाहीं, हेंहेि तितकेंच निश्चित आह. म्हणून अध्यात्मदृष्टया नीतिशास्रास आधार म्हणून घेतलेली सर्वभूतात्मैक्यरूप परत्र द्माची अव्यक्त कल्पना सोडून दिली तरी अखेरीस त्याऐवजीं “सर्व मानवजात” ही डोळ्यांनीं न दिसणारी अतएव अव्यक्त वस्तुचदेवासारखी पूज्य मानणें भाग पडतें, व त्यांतच पूर्वीच्या व पुढच्या पिढ्याचा समावेश केल्यानें अमृतत्वाबद्दलची मनुष्याची स्वाभाविक प्रवृति तृप्त झाली पाहिजे असे मानून, या बड्या देवाची प्रेमानं व अनन्यभावानें उपासना करणे, त्याच्या सवंत आपलें सर्व आयुष्य खर्च करणे, किंवा त्याच्याकरितां सर्व स्वार्थाचा यज्ञ करणे, हेंच प्रत्येक मनुष्याचे या जगांतील परम कर्तव्य होय, असा नव्याण्णव हिश्शानें आधिभौतिक पंडितहिं आतां मोठ्था कळकळीनें उपदेश करूं लागले आहेत. फ्रेंच पंडित केॉट यानें प्रतिपादिलल्या धर्माचे हेंच सार असून या धर्मासच “सकल-मानव ज्ञातिधर्म” किंवा थोडक्यांत सांगावयाचे असल्यास “मानव-धर्म” असें गॉडस नांव त्यानें आपल्या ग्रंथात दिले आहे.* अलीकडील जर्मन पंडित नित्शे याची गोष्टहिं याच प्रकारची आहे.इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकांत “परमेश्वर मयत झाला आहे” असें यानें स्पष्ट विधान केले असून, अध्यात्मशास्र सर्व झूट आहे असें याचे म्हणणें आहे. तथापि आधिभौतिकदृष्टयाच कर्मविपाक व पुनर्जन्माचे चक कबूल करून आपल्याला पुन: जन्मोजन्मा करितां येईल अशा प्रकारचे कृत्य करणे, आणि ज्याच्या सवै मनोवृति अत्यंत विकसित होऊन पूर्णावस्थेस पोचलेल्या आहेत असें मानवी जनावर जेणेकरून पुढे निर्माण होईल अशा रीतीनें समाजव्यवस्था राखणें, हेंच या जगांत मनुष्यमात्राचे कर्तव्य व परमसाध्य होय असें त्यानें आपल्या सर्व ग्रंथांतून प्रतिपादन केले आहे. अध्यात्मशास्र ज्यांना कबूल नाही त्यांनाहि कर्माकमैविवेचन करितांना कांहीं तरी परमसाध्य मानावें लागतें व तें एक प्रकारें ‘अव्यक्त'च असतें असें यावरून दिसून येईल. कारण सर्व मानवज्ञातिरूप महादेवतेची उपासना करून सर्व मनुष्यांचे हित संपादन करा म्हटलें काय, किंवा पुढे केव्हां तरी अत्यंत पूर्णावस्थेस पोचलेला मनुष्यप्राणी जेणेकरून उत्पन्न होईल अशीं कर्मे करा म्हटले काय, आधिभौतिक नीतिशास्रज्ञांचीं हीं दोन्ही ध्येयं ज्यांस हा उपदेश करावयाचा त्यांच्या दृष्टीला अगोचर म्हणजे अव्यक्तच आहत. केॉट किंवा

  • कोर्ट यानें आपल्या धर्मास Religion of H umanity अर्से नांव दिले आहे; a *qfà êífáôÜ fää* áí*T A System at Posuive A/tty (Engtrans, in f०gr V५ls) या प्रथात केलेले आहे. केवळू आधिभौतिकदृष्टयाहि समाजधारणा कशी करितां येईल याची या ग्रंथांत उत्तमचर्चा केलेली आहे.