पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Y" の गीतारहस्य अथवा कर्मयेोग झानान व तीव्र वैराग्यानें ते सर्व सांसारिक कर्मे सोडीत नाहीत; आणि संसारांत राहूनहि कर्मयोग्याप्रमाणें शास्रतः प्राप्त झालेलें आपलें कर्तव्य निष्काम बुद्धीनें करीत नाहीत. म्हणून या वाचेिक संन्याठयांची गणना गीतेंत न वर्णिलेल्या अशा एका निराळ्या तृतीय निर्धृत केली पाहिजे कोणत्यहि कारणानें कां होईना लेोक अशा रीतीनें तृतीयप्रकृति वनले, म्हणजे धर्माचाहि अरेनर नाश झाल्याखेरीज रहात नाहीं. इराणांतून पारशी धूमीस खे मिळण्यास हीच स्थिति कारण झाली असून त्यामुळे हिंदुस्थानातून वैदिक धर्महि समूलं च विनश्यति होण्याची वेळ आली होती. पण बौद्ध धमीच्या -हासानंतर वेदान्ताबरोबर गीतेंतील भागवतधर्माचे जें पुनरुजीवन झाले त्यामुळे आमच्याकडे हा दुष्परिणाम घडून आला नाहीं. दौलताबादचे हिंदु राज्य मुसलमानांनीं बुडविण्यापूर्वी कांही वर्षे आमच्या सुदैवानें श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी भगवद्गीतस “ देशीकार लेणें ” करून “ म-हाठियेचिया नगरी ” गीतेंतील “ ब्रह्मविद्येचा सुकाळु ” करून सोडिला होता; आणि हिंदुस्थानातील इतर प्रांतांतहि याच वेळी गीतेंतील भक्तिमार्गाचा उपदेश दुसच्या साधुसंतांनी जारीनें चालू ठेविला होता. वैराग्ययुक्त भक्तिरूपानेंच कां होईना पण यवनब्राह्मणचांडाळादिकांस सम आणि ज्ञानमूलकू गीताधर्माचा जाज्वल्य उपदेश चोहींकडे एकसमयावच्छेदेंकरून चालू राहिल्यांमुळे हिंदुधर्माचा पुरा उहास होण्याचे भय नाहींसें झाले, इतकेंच नव्हे तर करड्या मुसलमानी धर्मीवरहिं त्याची थोडीशी छाप बसून कबीरासारख्या साधूचा संतमंडळांत समावेश होऊं लागला; आणि उपनिषदांचे फारशी भाषांतरहि याच वेळीं औरंगझेबाचा वडील भाऊ शाहाजादा दारा यानें आपल्या देखरेखीखालीं तयार करविलें. वैदिक भक्तिमार्ग अध्यात्मज्ञानाला सोडून नुस्त्या तात्रिक श्रद्धेच्याच पायावर उभारलेला असता तर हें सामथ्यै त्याच्या अंगांत राहिले असतं का नाहीं याचा वानवाच आहे. तथापि भागवतधर्माचे हें आधुनिक पुनरुज्जीवन मुसलमानी अमदानीतच झाले असल्यामुळे तेंहि बहुतेक भक्तिपर म्हणजे एकदेशीय होऊन, मूळ भागवतधर्मातल्या कर्मयोगाचे एकंदां कमी झालेलें स्वतंत्र महत्त्व त्यास पुनः प्राप्त न होतां कर्मयोग संन्यासमार्गाचे अंग किंवा साधन आहे असे म्हणण्याऐवजीं तो भक्तिमार्गाचे अंग आहे असें या वेळची भागवतधर्मीय संतर्मडळी, पंडित व आचार्यहि म्हणू लागले. तत्कालीं प्रचलित असलेल्या या समजुतीस श्रीसमर्थ रामदासस्वामींचे ग्रंथ हाच काय तो छामच्या माहितीप्रमाणें एक अपवाद आहे; आणि कर्ममार्गाचे खरें महत्त्व शुद्ध व प्रासादिक मराठी भाषेत सांगितलेलें ज्यास पहावयाचे असेल त्यानें समर्थाच्या दासबोधाचे व त्यांतलेत्यांतहि विशेषंकरून उत्तरार्धाचे पटण केले पाहिजे. श्रीसमर्थाचाच उपदेश शिवाजी महाराजांस मिळालेला होता; व मराठेशाहींत पुढे कर्म