पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Yፄ3 गीतारहस्य अथवा कर्मयोग वर अवलंबून न ठेवितां सर्वसामान्य आध्यात्कि ज्ञानाच्या आधारें प्रतिपादिली आहे. शास्रतः प्राप्त झालेलें कर्तव्य निष्काम व आत्मौपम्य बुद्धीनें केले पाहिजे हें गीतेतील नीतिधर्माचे मुख्य सार होय, व हें सर्व देशांतील लोकांस एकसारखेंच लागूंपडतें. पण आत्मौपम्यदृष्टीचे व निष्काम कर्माचरणाचें हें सामान्य नीतितत्त्व जरी सिद्ध झाले तरी तें ज्या कर्मास लागूं करावयाचे ती कमें या जगांत प्रत्येकास कशीं प्राप्त होतात याचाहि कांहीं खुलासा करणे जरूर होतें. म्हणून तें सांगण्यास तत्कालीं लागूं पडणारें साहजिक उदाहरण या नात्यानें चातुर्वण्याचा गीर्तत उल्लेख केलेला आहे; वे त्याबरोबर गुणकर्मविभागानें त्या समाजव्यवस्थेची थोडक्यांत उपपतिहि दिली आहे. पण हा कांहीं गीतेचा मुख्य भाग नसून चातुर्वण्र्यव्यवस्था जर कोठे चालू नसेल किंवा लंगडी पडली असेल तर तेथे सुद्धां तत्कालीं अंमलांत असलेल्या समाजव्यवस्थेप्रमाणें समाजधारणपोषणाचीं जीं जा कामें आपणांस प्राप्त होतील तीं तीं लोकसंग्रहाथै धैर्येत्सिाहानें व निष्काम बुद्धीनें कर्तव्य म्हणून करण्यासाठीं मनुष्य जन्मास आला आहे-केवळ सुखोपभोगार्थ नव्हे-असा सर्व गीताशास्राचा व्यापक सिद्धान्त आहे. गीतेंतील नीतिधर्म केवळ चातुर्वण्र्यमूलक आहे असें जें कित्येकांचे म्हणणे आहे तें खरें नव्हे, हें लक्षांत ठेविले पाहिजे. समाज हिंदूंचा असो वा म्लेच्छांचा असो, प्राचीन असो वा अर्वाचीन असो, पौरस्य असो वा पाश्चिमात्य असो,त्यांत चातुर्वण्यव्यवस्था अंमलांत असल्यास त्याप्रमाणे, किंवा दुसरी समाजव्यवस्था अंमलांत असेल तर त्याप्रमाणें, जें काम आपणांस प्राप्त झाले, अथवा शक्य असल्यास आपल्या अभिरुचीप्रमाणे आपण कर्तव्य म्हणून एकदा पत्करिलें, तेंच आपला स्वधर्म बनतें; आणि तो धर्म सोडून देऊन कोणत्याहि सबबीवर आयत्या वेळीं कोणीं दुस-याच काम करूंलागणे, हें धर्मदृष्टया व सर्वभूतहितदृष्टया गई होय असेंगीता सांगत आहे. “स्वधर्मे निधनं श्रेयःपरधर्मो भयावहः” (गी.३.३५)-स्वधर्मात मरण आले तरी तें श्रेयस्कर, पण परक्याचा धर्म भयावह होय,-या गीतावचनाचे हेंच तात्पर्य असून, या न्यायानेंच जातीचे ब्राह्मण असतांहि देशकालानुरूप क्षात्रधमांचा अंगीकार करणार थोरले माधवराव पेशवे यांस “स्नानसंध्यंतवेळ न घालवितां क्षात्रधर्माप्रमाणे प्रजेचे संरक्षण करण्यांत आपला सर्व वेळ खर्च करण्यांतच तुमचे उभयत्र कल्याण आहे” असा रामशास्रीबुवांनीं उपदेश केला ही गोष्ट महाराष्ट्रांत सुप्रसिद्ध आहे. समाजधारणेसाठी कोणती व्यवस्था असावी हें सांगण्याचा गीतेचा मुख्य उद्देश नाहीं. समाजव्यवस्था कोणतीहि असो त्यांत यथाधिकार प्राप्त झालेलें कर्म उत्साहानें करून सर्वभूतहितरूप आत्मश्रेय साधा हें गीताशास्राचे तात्पर्य आहे. अशा रीतीनें कर्तव्य म्हणून गीतंतील स्थितप्रज्ञ जीं कर्म करितो ती स्वभावतःच लोककल्याणकारक होत