पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहारः **も असतात हें खरें; पण गीतेंतील स्थितप्रज्ञाचे मनांत माझ्या कर्मानीं मी लोककल्याण करितों ही अभिमानबुद्धि नसून साम्यबुद्धि हा त्याचा देहस्वभाव झाल्यामुळे तत्तत्कालीन समाजव्यवस्थेप्रमाणें केवळ कर्तव्य म्हणून तो जी कमें करितो तींच स्वभावतः लोककल्याणकारक होत असतात, आणि आधुनिक पाश्चात्त्य नीतिशास्त्रज्ञ संसार सुखमय मानून हें संसारसुख सर्व लोकांस प्राप्त करून देण्यासाठीं लोककल्याणाची कामें करण्यास सांगत असतात, हा पाश्चिमात्थ आधिभौतिक कर्ममार्गात व गीतेंतील कर्मयोगांत महत्त्वाचा भेद आहे. तथापि सर्वच पाश्चात्य आधुनिक कर्मयोगी संसार सुखमय मानणारे आहेत असें नाहीं. शोपेनहौएरप्रमाणें संसार दुःखप्रधान आहे असें कबूल करूनहि लोकांचे हें दुःख होईल तेवढे कमी करणें हें शहाण्या पुरुषाचे कर्तव्य असल्यामुळे संसार न सोडितां लोकांचे दु:ख होईल तितकें कमी करण्याचा ज्ञानी पुरुषानें प्रयत्न केला पाहिजे असें प्रतिपादन करणारा किंवा दुःखनिवारणेच्छु कर्मयोग्यांचा एक पंथहि पाश्चिमात्य देशांत आतां निघालेला आहे; व त्याचे गातेंतील कर्मयोगाशीं बरेंच साम्य आहे. “सुखाद्वहुतरं दुःखं जीविते नात्र संशयः”-संसारांत सुखापेक्षां दुःखच अधिक आहे-असें महाभारतांत जेथे म्हटले आहे तेथेच न जानपदिकं दुःखमेकः शोचितुमर्हति । अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ॥ “जें दुःख सार्वजनिक आहे त्याचा शोक करीत बसणें येोग्य नाही; त्यासाठी रडत न बसतां त्याच्या प्रतिकारार्थ आपल्याला इलाज सुचेलतर ती (ज्ञानी पुरुषानें) करावा” —असें मनूनें बृहस्पतीस व नारदानें शुकास सांगितलें आहे (शां.२०५.५ व ३३०. १५). यावरून संसार दुःखमय असला तरी त्यांत सर्व लोकांस होणारें दुःख कमी करण्याचा उद्योग शहाण्या पुरुषानें केला पाहिजे, हें तत्त्व महाभारतकारांसहि ग्राह्य आहे असें स्पष्ट होतें. परंतु हा कांहीं आमचा सिद्धान्तपक्ष नव्हे. ऐहिक सुखापेक्षांहि आत्मबुद्धिप्रसादापासून होणाच्या सुखास अधिक महत्त्व देऊन या आत्मबुद्धिप्रसादसुखाचा पूर्ण अनुभव घेत असता केवळ कर्तव्य म्हणून, म्हणजे लोकांचे दुःख मी कमी करोन अशी राजस अभिमानबुद्धि मनांत न ठेवितां, सर्वे व्यावहारिक कर्मे करण्यास सांगणाच्या गीर्तेतील कर्मयोगाची बरोबरी होण्यास दुःखनिवारणेच्छु पश्चिमात्य कर्मयोगांतहि अद्याप पुष्कळ सुधारणा झाली पाहिजे. स्वतःचे किंवा सर्व लोकांचे ऐहिक सुख,-मग ते सुखाची साधनें वाढवून होवो, किंवा दुःख कमी करून प्राप्त होवेो-हंच काय तें मनुष्याचे या जगांतील खरं परम साध्य या समजुतीनें सर्व पाश्चिमात्य पंडितनेहूमीच थोडेबहुत पछाडलेले असल्यामुळे, संसार दुःखमय असला तरो तो अपरिहार्य समजून केवळ लोकसंग्रहार्थ जगां