पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार ४९१

कर्ममार्गातील लोक “सुखप्राप्तीच्या आशेनें संसार करणारे” असतात आणि पाश्चिमात्य कर्मत्यागमार्गातील लोक “संसारास कंटाळलेले” असतात, असे म्हणावें लागतें; आणि प्रायः याच कारणामुळे त्यांस “आशावादी आणि निराशावादी' अशीं नांवें अनुक्रमें देण्यांत येतात.*परंतु भगवद्गीतेंत ज्या दोन निष्ठा वर्णिल्या आहेत त्या याहून भिन्न आहेत. स्वत:च्या काय आणि लोकांच्या काय, कसेंहि झाले तरी, ऐहिक विषयसुखाच्या लालुचीमुळेच संसारास प्रवृत्त झाल्यानें साम्यबुद्धिरूप सात्त्विक वृत्तांत थोडा तरी कमीपणा आल्याखेरीज रहात नाहीं. म्हणून गीतेचे असें सांगणें आह कीं, संसार सुखमय असो वा दुःखमय असो, सांसारिक कर्मे सोडूं म्हटल्यासहि जर सुटत नाहीत, तर त्यांच्या सुखदुःखांचा विचार करण्यांत कांहीं फायदा नाहीं. सुख असो वा दुःख असो, मनुष्यजन्म प्राप्त झाला हेंच महद्भाग्य समजून कर्मसृष्टीच्या या अपरिहार्य व्यवहारांत जें जें प्राप्त होईल तें तें अंतःकरणाचा हिरमोड न होऊं देतां, “दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः” (गी.२.५६) या न्यायानें म्हणजे साम्यबुद्धीनें सहन करणे आणि जगाच्या धारणपोषणार्थ आपल्या अधिकाराप्रमाणे कर्माचा जो भाग शास्रतः आपल्या वांट्यास आला आहे, तो अमक्यातमक्यासाठी नव्हे, तर निष्काम बुद्धीनें आमरणान्त करीत रहाणें हंच मनुष्याचे कर्तव्य होय. गीताकाली चातुर्वण्र्यव्यवस्था अमलांत होती या कारणामुळे हीं सामाजिक कर्म चातुर्वण्यैविभागाप्रमाणें प्रत्येकास प्राप्त होतात असें म्हटलें असून अठराव्या अध्यायांत गुणकर्मविभागशः हे भेद कसे निष्पन्न होतात तें सागितलें आहे (गी.१८.४१-४४). पण तेवढ्यावरून गीतेतील नीतितत्त्वं चातुर्वण्र्यरूपी समाजव्यवस्थेवरच अवलंबून आहत असे कोणीं समजू नये. अहिंसादि नीतिधर्माची व्याप्ति चातुर्वण्यापुरतीचे नसून हे धर्म मनुष्यामात्रास सामान्यतःच प्राप्त आहत ही गोष्ट महाभारतकारांच्या पूर्ण लक्षांत आलेली होती. म्हणून चातुर्वण्याबाहेरच्या ज्या अनार्य लोकांत हे धर्म चालू असतात त्या लोकांचे राजानें जें रक्षण करावयाचे तें या सामान्य धर्मप्रमाणेच केले पाहिजे असें भारतांत स्पष्ट म्हटले असून (शां. ६५.१२-२२पहा), गीतेंतील नीतीची उपपात चातुर्वण्यादि कोणत्याच एखाद्या विशिष्ट समाजव्यवस्थे

  • Řeg Hét (James Sully) zsfā 3TqFII Pessimism HiāTEHT garākā Optimist atför Pessimist aqà àa ġa affè afèĦ.?# Optimist म्हणजे *उल्हासी? आणि Pessim1st म्हणजे ‘संसारास कंटाळलेले' असा अर्थ असून हे शब्द गीतेंतील ‘योग’ आणि ‘सूख्य' य्शीं सर्वाशीं समानार्थक् नाहीत हें आम्हीं पूर्वी एक ट्रीपेंत (पृ.३६१ पढ़ा) सांगित्लं आहे; आणि त्याचाच येथे विस्तार केला.आहे. ‘g: च्छु' भ्हणून जो एक तिसरा पंथ पुढें वर्णिला आहे त्याला सली यानें Meliorism असें नविं दिलें आहे.