पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Y&Y’s गीतारहस्य अथवा कर्मयोग लागले. या प्रतिपादनांत पुष्कळांचे पुष्कळ हित मनुष्यानें कां करावें याची उपपात न देतां, ही एक मनुष्याची वाढत जाणारी स्वाभाविक प्रवृति आहे एवढेच सांगण्यांत येतं.तथापि मनुष्यस्वभावांत दृश्यहेाणाच्या स्वार्थासारख्या दुस-या प्रवृत्ति असल्यामुळे या पंथांतहिं पुनः भेद होऊं लागले. नीतिमतेच्या या उपपत्त्या सर्वस्वीं निर्देष आहत असें नाहीं. पण सृष्टीत दृश्य होणाच्या पदार्थौपलीकडे सृष्टीच्या बुडाशी कांहीं तरी अव्यक्त तत्त्व आहे या सिद्धान्तावर या पैथांतील सर्व पंडितांचा सारखाच आविश्वास किंवा अश्रद्धा असल्यामुळे आपल्या प्रतिपादनांत कितीहि अडचणी आल्या तरी केवळ बाह्य व दृश्य तत्त्वांनाच कसा तरी निवौह करून घेण्याचा हे नेहमीं प्रयत्न करीत असतात. नीति सर्वांनाच हवी असली, तरी पिंडब्रह्मांडाच्या रचनेसंबंधानें निरनिराळीं मतें असल्यामुळे नीतिशास्राच्या त्यांच्या उपपत्तींतनेहमी कॅसँीं फरक पडत असतो हें यावरून दिसून येईल; आणि याच कारणासाठी पिंडव्रह्मांडाच्या रचनेबद्दल आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक मतांप्रमाणें नीतिशास्राच्या प्रतिपादनाचे तिसच्या प्रकरणांत तीन भेद करून पुढे प्रत्येक पंथांतील प्रमुख सिद्धान्तांचा आम्हीं निरनिराळा विचार केला आह. सर्व दृश्य सृष्टि सगुणपरमेश्वरानें निमीण केला असें ज्यांचे मत आहे ते आपआपल्या धर्मपुस्तकांतील परमेश्वराच्य। आज्ञा किंवा त्याच्याच सतेनें निमणि झालेली सदसद्विवेचनशक्तिरूप देवता यांपलीकड नीतिशास्त्राचा विचार करीत नाहीत. या पंथासच आम्हा ‘आधिदैविक’ पंथ असें नांव दिले आहे. कारण, सगुण परमेश्वर म्हटला तरी एक दैवतच होय. दृश्य सृष्टीच्या बुडाशों केोणतेंहि अदृश्य तत्त्व नाहीं, किंवा असल्यास तें मनुष्याच्या बुद्धीस अगम्य आहे, असें ज्यांचे मत आहे ते पुष्कळांचे पुष्कळ कल्याण किंवा माणुसकीचा परम उत्कर्ष या दृश्य तत्त्वावरच नीतिशास्राची इमारत उभारीत असतात, आणि या बाह्य व दृश्य तत्त्वापलीकडे जाण्यांत कांहीं अर्थ नाहीं असें मानितात. या पंथास आम्ही ‘आधिभौतिक' असें नांव देतें. नामरूपात्मक दृश्य सृष्टीच्या बुडाशीं आत्म्यासारखें नित्य व अव्यक्त कांही तरी तत्त्व आहे असा ज्याचा सिद्धान्त आहे ते आपल्या नीतिशास्राची उपपात आधिभौतिक उपपत्तीच्या पलीकडे नेतात; आणि आत्मज्ञान व नीति किंवा धर्म याचा मेळ घालून मनुष्याचे जगांतील कर्तव्य काय याचा निर्णय करितात. या पंथास आम्हीं ‘आध्यात्मिक' ही संज्ञा दिली आहे. तिन्ही पंथांतील आचारात्मक नीति एकच आह; पण पिडब्रह्मांडाच्या रचनेबद्दल प्रत्येक पंथाचे मत निराळे असल्यामुळे नीतिशास्राच्या मूलतत्त्वांचे स्वरूप दरएक पंथांत थोडें थोडें बदलत गेले आहे. व्याकरणशास्र ज्याप्रमाणें नवी भाषा न बनवितां व्यवहारांत जी भाषा असत्ये तिचेच नियम शोधून काढून भाषेच्या अभिवृद्धीस मदत करितें,