पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंह्रार ゞcい त्याप्रमाणेच नीतिशास्राचा प्रकार आहे. मनुष्य या सृष्टींत उत्पन्न झाल्या दिवसापासून स्वतःच्या बुद्धीनेंच तो आपलें वर्तनदेशकालाप्रमाणें शुद्ध ठेवीत आला आहे; व वेळोवेळीं जे थोर पुरुष निर्माण झाले त्यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे आचारशुद्धयर्थ चोदनारूपी नियमहि घालून दिलेले आहेत. नीतिशास्र हे नियम मोडून नवे नियम घालण्याकरितां प्रवृत्त झालेले नाहीं. हिंसा करूं नको, सत्य बोल, परोपकार कर, इत्यादि नीतीचे नियम प्राचीन कालापासून चालत आलेले आहेत, पण नीतीची वाढ होण्यास सोयीचे पडावें म्हणून या नीतीच्या नियमांतील मूलतत्त्व काय एवढेच नीतिशास्रांत पहावयाचे असतें; व त्यामुळे नीतिशास्राचेा कोणताहि पंथ घेतला तरी नीतीचे हल्लीं प्रचारांत असलेले नियम सर्व पंथांत एकच असतात. त्यांत जो भद पडती ती उपपत्तीच्या स्वरूपाबद्दलचा होय; आणि हा भेद पडण्यास दरएक पंथाचे पिंडब्रह्मांडाच्या रचनेसंबंधानें निरनिराळे मत हेंच मुख्य कारण आहे, असें जें डॅ. पॅलि कॅरस यानीं म्हटले आहे तेंच खरें असे दिसून येतें. नीतिशास्रावरील मिल्ल, स्पेन्सर, केॉट आदिकरून आधिभौतिक पंथांतील आधुनिक पाश्चिमात्य ग्रंथकारांनी आत्मौपम्यदृष्टीचे सुलभ व व्यापक तत्त्व सोडून देऊन “सर्वभूतहित”किंवा “पुष्कळांचे पुष्कळ हित” या आधिभौतिक बाह्य तत्त्वावरच नीतीची इमारत उभारण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो पिंडब्रह्मांडासंबंधानें त्यांचीं मतें प्राचीन मतांहून भिन्न असल्यामुळे केलेला आहे, एवढे याप्रमाणें सिद्ध झाल्यावर, ब्रह्मांडाच्या रचनेसंबंधाचीं ही नवीन मतें कबूल नसून मी कोण, सृष्टि म्हणजे काय, मला या सृष्टीचे ज्ञान कसें होतं, माझ्याहून बाह्य सृष्टि स्वतंत्र आहे किंवा नाहीं, असल्यास तिच्या बुडाशीं कोणतें तत्त्व आहे, या तत्त्वाचा व माझा संबंध काय, एका मनुष्यानें दुसन्याच्या सुखासाठी आपला जीव कां खर्च करावा, ‘जें जन्मलें तें मरतें' या न्यायानें ज्या पृथ्वीवर आपण रहातों तिचाच प्राणिमात्रासह केव्हांना केव्हां तरी नाश होणार हें जर निश्चित आहे तर नाशवंत पुढील पिढ्यांसाठी आपण आपल्या सुखाची होळी कां करावी, इत्यादि प्रश्नांचा ज्यांस खोल विचार करावयाचा आहे, किंवा परोपकार वगैरे मनोवृति कर्ममय अनित्य दृश्य सृष्टीतील नैसर्गिक प्रवृत्ति आहेत एवढ्या उत्तरानें ज्यांचे पूर्ण समाधान होत नसून या प्रवृत्तीचे मूळ काय हें ज्यांना पहाणे आहे, त्यांना अध्यात्मशास्रांतील नित्य तत्त्वज्ञानाकडे वळल्याखेरीज गत्यंतर नाहीं: आणि याच कारणास्तव ग्रीन यानें आपल्या नीतिशास्रावरील ग्रंथास जडसृष्टीचे ज्या आत्म्याला ज्ञान हेोतें तो आत्मा जड सृष्टीहून भिन्न असला पाहिजे यथपासूनच सुरुवात केली असून, कान्ट यानें प्रथम व्यवसायात्मक बुद्धीचे विवेचन करून मग वासना