पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसेद्दारः ゞくも त्याच्या विचारांचा रंग पालटत असतो. पिंडब्रह्मांडाच्या रचनेबद्दल कांहीं तरी निश्चित मत असल्याखेरीज खरें म्हटलें म्हणजेनैतिक प्रश्नच उपस्थित होत नाहीं. पिंडब्रह्मांडाच्या रचनेविषयों कायम मत नसतांहेि आपल्या हातून कदाचित् नैतिक वर्तन घडू शकेल; पण हें वर्तन झोपेंतल्या व्यापाराप्रमाणे असल्यामुळे यास नैतिक म्हणण्याऐवजींदेहधर्मानुसार घडणारीकेवळ कायिक चेष्टा असं म्हटले पाहिजे.” उदाहरणार्थ, वाघीण ही आपल्या पिल्लांच्या रक्षणार्थ जीवदेण्यास तयार होत्ये. पण वाघिणीचे हें वर्तननैतिक न म्हणतां तिचा हा जन्मतःसिद्ध स्वभाव आहे असें आपण म्हणत असतें. नीतिशास्राच्या उपपादनांत अनेक पंथ कां निघाले याचा या उत्तरावरून चांगला उलगडा होतो. कारण, मी कोण, जग कसें झाले, माझा या जगांत काय उपयोग, इत्यादि गूढ प्रश्नांचा ज्या तत्त्वानें निकाललागणार त्यानेंच मी आपल्या हयातीत लोकांशीं कसें वागावें याचाहि प्रत्येक विचारी पुरुष अखेर निकाल लावणार, यांतकांहीं शंका नाहीं. परंतु या गूढ प्रश्नांचे उत्तर निरनिराळ्या काळी व निरनिराळ्यादेशांत एकच असू शकत नाहीं.युरोपखंडांत चालू असलेल्या ख्रिस्ती धर्मात मनुष्याचा वसृष्टीचा कर्ता बायबलांतीलसंगुणूपरमेश्वर असून त्यानेंच प्रथमत:जग उत्पन्न करून सदाचरणाचे नियम किंवा आज्ञा मनुष्यास घालून दिल्या असें वर्णन आहे; आणि पिंडब्रह्मांडाच्या बायबलांतील या कल्पनेप्रमाणें बायबलांत सांगितलेले नीतीचे नियम हेच नीतिशास्राचे मूळ असा पहिल्यानें ख्रिस्ती पंडितांचा आभप्राय होता. पुढे पुढेहे नियम व्यवहारास अपुरे पडतात, असें दृष्टीस पडल्यावर या नियमांच्या पूत्यैर्थ किंवा स्पष्टीकरणार्थ परमेश्वरानेंच सदसद्विवेकशक्ति मनुष्यास दिली आहे असें प्रतिपादन होऊं लागलें. पण चीराची व सावाची सदसद्विवेकशक्ति एक नसत्य ही अडचण पुढे लक्षांतयेऊन परमेश्वराची इच्छा हाच जरी नीतिशास्राचा पाया असला, तरी परमेश्वराची ही इच्छा पुष्कळांचे पुष्कळ कल्याण कशांत आहे याचा विचार केल्यानें आपणास समजत्ये, तिचे स्वरूप जाणण्यास दुसरें साधन नाहीं, हें मत प्रचारांत आले. हीं सर्व मतें बायबलांतील सगुण परमेश्वरच जगाचा कर्ता असून मनुष्यानें नीतीनें वागावें ही त्याचीच इच्छा किवा आज्ञा होय, अशी जी पिंडब्रह्मांडाच्या रचनेसंबंधानें ख्रिस्ती लेाकांची समजूत त्या समजुतीला धरून आहेत. परंतु ख्रिस्ती धर्मपुस्तकांतील पिंडब्रह्मांडाच्या रचनबद्दलचे सिद्धान्त बरोबर नाहीत असें आधिभौतिक शास्राच्या वाढोनें नजरेस आल्यावर, परमेश्वरासारखा सृष्टीचा कोणी कर्ता आहे किंवा नाही याचा विचार बाजूला राहून नीतिशास्राची इमारत प्रत्यक्ष दिसणाच्या गोष्टींच्या पायावर उभारतां येईल कीं नाहीं हा विचार सुरूं झाला; आणि पुष्कळांचे पुष्कळ सुख अगर कल्याण, किंवा माणुसकीची वाढ, हीं दृश्य तत्त्वेंच नीतिशास्राचे मूळ होय असें प्रतिपादन होऊं