पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८० गीतारहस्य अथवा कर्मयोग

जें कर्म करण्यास सांगत्ये तें “आपल्याप्रमाणेच इतरांनीं केले तर काय होईल” याचा विचार करून सांगितलेले असतें; आणि (५) वासनेची ही शुद्धता व स्वतंत्रता यांची उपपत्ति कर्मसृष्टि सोडून ब्रह्मसृष्टीत शिरल्याखेरीज लागत नाहीं. परंतु आत्मा व ब्रह्मसृष्टि यासंबंधीं कान्ट याचे विचार थोडे अपुरे असल्यामुळे ग्रीन हा जरी कान्टचाच अनुयायी आहे तरी आपल्या “नीतिशास्त्राच्या उपोद्घातांत” बाह्य सृष्टींत म्हणजे ब्रह्मांडांत जें अगम्य तत्त्व आहे तेंच आत्मस्वरूपानें पिंडीं म्हणजे मनुष्याचे देहांत अंशतः प्रादुर्भूत झालेले आहे असें प्रथम सिद्ध करून पुढें मनुष्याच्या शरीरांतील नित्य व स्वतंत्र तत्त्वास म्हणजे आत्म्यास आपलें सर्वभूतान्तर्गत सामाजिक पूर्ण स्वरूप प्राप्त करून घेण्याची जी दुर्धर इच्छा तीच मनुष्यास सदाचरणाकडे प्रवृत्त करीत असत्ये, आणि त्यांतच मनुष्याचें नित्य व कायमचें कल्याण असून विषयसुख, अनित्य आहे असें त्यानें प्रतिपादन केलें आहे. सारांश, कान्ट व ग्रीन या दोघांची ही दृष्टेि जरी आध्यात्मिक असली तरी व्यवसायात्मक बुद्धीच्या व्यापारांतच गुरफटून न रहातां कर्माकर्मविवेचनाची व वासनास्वातंत्र्याची उपपत्ति ग्रीन यानें पिडीं व ब्रह्मांडी मिळून दोहोंकडे एकत्वानें व्यक्त होणाऱ्या शुद्ध आत्मस्वरूपाला नेऊन भिडविली आहे असें दिसून येईल. कान्ट व ग्रीन या आध्यात्मिक पाश्र्चिमात्य नीतिशास्त्रज्ञांचे हे सिद्धान्त, आणि (१) बाह्यकर्मापेक्षा कर्त्याची (वासनात्मक) बुद्धिच श्रेष्ठ आहे, (२) व्यवसायात्मक बुद्धि आत्मनिष्ठ होऊन निःसंशय व सम झाली म्हणजे मग वासनात्मक बुद्धि आपोआपच शुद्ध व पवित्र होत्ये;(३) अशा रीतीनें ज्याची बुद्धि सम व स्थिर झाली तो स्थितप्रज्ञ पुरुष स्वतः नेहमींच विधिनियमांपलीकडच्या स्थितीत असून, (४)त्याचे वर्तन किंवा त्याच्या आत्मैक्यबुद्धीनें सिद्ध होणारे नीतीचे नियम सामान्यमनुष्यास कित्त्यासारखे प्रमाण होतात; आणि (५)पिंडीं व ब्रह्मांडीं एकच आत्मस्वरूपी तत्त्व असून देहांतील आत्मा आपलें शुद्ध व पूर्ण स्वरूप (मोक्ष) प्राप्त करून घेण्यास उत्सुक असतो, व या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान झालें म्हणजे सर्वांभूतीं आत्मौपम्यदृष्टि प्राप्त होत्ये-- इत्यादि गीतेंतील सिद्धान्त, हे दोन्ही जरी तंतोतंत बरोबर नाहींत तरी त्यात किती विलक्षण साम्य आहे, हें कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. तथापि ब्रम्ह, आत्मा, माया, आत्मस्वातंत्र्य, ब्रह्मात्मैक्य, कर्मविपाक इत्यादि बाबतींत वेदान्तशास्राचें सिद्धान्त कान्ट व ग्रीन यांच्याहि पुढें गेलेले व निश्र्चित असल्यामुळें उपनिषदांतील वेदान्ताच्या आधारेंं केलेलें गीतेंतील कर्मयोगाचें विवेचन आध्यात्मिकदृष्ट्या अधिक निःसंदिग्ध व पूर्ण झालेले आहे; व प्रस्तुतचे वेदान्ती जर्मन पंडित प्रो. डायसन यांनी नीतिविवेचनाची हीच पद्धत आपल्या “अध्यात्मशास्राचीं मूलतत्त्वें” या


  • Green's Prolegomena to Ethics §§99,174-179 and 223-232.