पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहृत्र \g") ग्रंथांत स्वीकारिली आहे. डायसन हे शोपेनहौएरचे अनुयायी असून “संसाराचे कारण वासना असल्यामुळे तिचा क्षय केल्याखेरीज दुःखनिवृति होणे शक्य नाहीं, वासनाक्षय करणें प्रत्येकाचें कर्तव्य होय,” हा शोपेनहौएरचा सिद्धान्त त्यांस पूर्णपणें प्राह्य आहे, व या आध्यात्मिक सिद्धान्तावरून पुढे नीतीची उपपति कशी लागत्ये हें वर सांागेतलेल्या ग्रंथाच्या तिसन्या भागांत त्यांनीं स्पष्ट करून दाखविलें आहे. वासनाक्षय होण्यास किंवा झाल्यावरहेि कर्म सोडण्याची जरूर नाहीं, इतकेंच नव्हे तर वासनेचा पूर्ण क्षय झाला आहे कीं नाहीं हें परापकारार्थ केलेल्या निष्काम कर्मानीं जसें व्यक्त होतें तसें दुस-या कशानेंहि व्यक्त होत नसल्यामुळे, निष्काम कर्म हें वासनाक्षयाचेच लक्षण व फल आहे असें दाखवून वासनेची निष्कामता हेंच सदाचाराचे व नीतिमतेचेंहि मूळ होय असें डायसन यांचे प्रतिपादन आहे; व त्याच्या शेवटी “तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचार”(गी.३.१९) हा गीतेंतला श्वलेोक दिला आहे.*यावरून डायसन यांस ही उपपति गीतेवरूनच सुचली असावी असें दिसतें. कसेंहि असो, डायसन, ग्रीन, शोपेनहौएर, कान्ट याच्या पूर्वी किंब. हुना अरिस्टाटलच्याहि पूर्वी शेकडों वर्षे हे विचार आमच्यादेशांत प्रचलित झालेले होते ही कांही लहानसहान गोष्ट नव्हे. वेदान्त म्हणजे संसार सोडून मेक्ष संपादन करण्याची शु८क कटकट, अशी अलीकडे कित्येकांची समजूत होऊं लागली आहे; पण ही कल्पना खरी नाहीं. जगांत जें डोळ्यांना दिसतें त्याच्या पलीकडे जाऊन मी कोण, सृष्टीच्या वुडाशी कोणतें तत्त्व आहे, या तत्त्वाचा व माझा संबंध काय, हा संबंध लक्षात आणून माझें या जगांत परमसाध्य कोणतें ठरतें, आणि हें साध्य प्राप्त करून घेण्यास मी कोणत्या प्रकारचा आयुष्यक्रमणाचा मार्ग स्वाकारिला पाहिजे, किंवा कोणत्या मार्गानें कोणतें साध्य प्राप्त होईल, इत्यादि गहन प्रश्नांचा यथाशक्ति शास्त्रायरीत्या विचार करण्यासाठींच वेदान्तशास्त्राची प्रवृत्ति झालेली आह; आणि वास्तविक पाहिले तर सर्व नीतिशास्र अथवा मनुष्यांना व्यवहारांत एकमेकांशी कसें वागावें यासंबंधाचा विचार त्या गहन शास्राचेच एक अंग आहे, असें दिसून येईल. म्हणून कर्मयोगाची उपपति वेदान्तशास्राधारेंच लावावा लागत असून, संन्यासमागीय लोकांनीं कांहीं म्हटले तरी गणितशास्राचे ज्याप्रमाणें शुद्ध गणित व व्यावहारिक गणित असे दोन भेद आहत, तद्वत् वेदान्तशास्राचेहि शुद्ध वेदान्त व नैतिक किंवा व्यावहारिक वेदान्त असे दोन भेद होतात हें निर्विवाद आहे. कान्ट याचे तर असें म्हणणें आह कीं, ‘‘मी जगांत कसें वागावें ? किंवा माझें या जगांतील खरं कर्तव्य काय?” या नीतीच्या प्रश्नांचा विचार करितां करितांच ‘पर |88 Deussen's Azlements of Metaphysics, Eng. trans. 1909 p. o गी. र. ३१