पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपखद्दार ’ Yr ws & तत्त्व एकदेशीय च अपुरं पडतं, इतकेंच नव्हे तर त्यांच्या लेखामुळे असाहि भ्रम उत्पन्न होतेो कीं, मन, स्वभाव अगर शील अधिकाधिक शुद्ध आणि पापभीरु कसें होईल हा उद्योग करण्याऐवजी नीतिमान् बनण्यास कोणीहि आपल्या कर्मच्या बाह्य परिणामांचा हिशोब करण्यास शिकला म्हणजे बस्स आहे; आणि मग ज्यांची स्वार्थबुद्धिसुटलेली नसत्ये ते लोक कारस्थानी, तर्कटी किंवा ढोंगी (गीता.३.६) बनून एकंदर समाजाचेहि त्या मानानें नुकसान होण्याचा संभवू असतो. म्हणून केवळ नीतिमतेची कसोटी या दृष्टीनें पाहिले तरीहि कर्माचे नुस्ते बाह्य परिणाम पहाणे हा मार्ग अपुरा व कृपण ठरवून ‘बाह्य कर्मावरून व्यक्त होणाच्या व संकटसमयीहि दृढ रहाणाच्या साम्यबुद्धीसच या कार्मा, म्हणजे कर्मयोगांत, परिणामों शरण गेले पाहिजे, ज्ञानयुक्त निस्मीम शुद्ध बुद्धि किंवा शील हीच सदाचरणाची खरी कसोटा होय असा जो गीतेंत सिद्धान्त कला आहे, तेाच पाश्चिमात्य आधदैविक किंवा आधिभौतिक पक्षांतील मतांपेक्षां अधिक मार्मिक, व्यापक, मुद्देसूद आणि निर्दोष होय, असें आम्हा ठरवितों. नीतिशास्रावरील आधिभौतिक व आधिदैविक ग्रंथ सोडून नीतीचा अध्यात्मदृष्ट्या विचार करणाच्या पाश्चिमात्य पंडितांचे ग्रंथ पाहिले तर नीतिमत्तेचा निर्णय करण्याच्या कार्मीं गीतेप्रमाणे त्यांतहि कर्मापेक्षां शुद्ध बुद्धीसच अखेर विशेष प्राधान्य दिलेले आह असें आढळून येइल. उदाहरणार्थ प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कान्ट याचे ‘नीतीचीं आध्यात्मिक मूलतत्त्वें’ व दुसरे नीतिशास्रावरील ग्रंथ ध्या. कान्ट* यानें सर्वभूतात्मैक्याचा सिद्धान्त जरी दिला नाही तरी व्यवसायात्मकू व वासनात्मक बुद्धींचेाच सूक्ष्म विचार करून त्यानें जसेंठरावलेंआहे कीं,(१) कोणत्याहि कर्माची नैतिक किंमत सदर कर्मापासून किती लोकांस किती सुख होईल अशा बाह्य फलावरून न ठरावतां, कर्म करणाच्या पुरुषाची ‘वासना' केिती शुद्ध आहे हें पाहूनच ठरविली पाहिजे; (२) मनुष्याची ही वासना (किंवा वासनात्मक बुद्धि) इंद्रियसुखाला लुब्ध न होतां सदैव शुद्ध (व्यवसायात्मक)बुद्धीच्या आइंत (म्हणजे या बुद्धीनें ठरावलेल्या कर्तव्याकर्तव्याच्या नियमांप्रमाणे) वागूं लागली म्हणजे ती शुद्ध, पवित्र व स्वतंत्र समजावी; (३) इंद्रियांचा निग्रह करून याप्रमाणें ज्याची वासना शुद्ध झाली त्या पुरुषास पुढे कोणतेहि नीतिनियम घालून देण्याची जरूर नाहीं; हे निर्बध सामान्य मनुष्यांसाठीं होत; (४) वासना या प्रकारें शुद्ध झाली म्हणजे ती

  • Kant's Theory cf Ethics, trans. by Abbótt, 6th Ed. "I पुस्तकांतहेसवै सिद्धान्त दिलेले आहेत. पहिलाएँछे १०,१९, १६, व २४ यांत; दुसरा पृष्ठ ११२ व ११७ यूत; तिसरा पृष्ठ ३१,५८, १२१ व २९० यांत; चवथा पृष्ठं.१८,३८, ५५ व ११९ यांत; आणि पांचवा पृष्टं ७०-७३ व ८० यांत वाचकांस पहावयास सांपडतील.