पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* \o & गीतारहस्य अथवा कर्मयोग “पुष्कळांचे पृष्कळ सुख” कशांत आहे हें ठरावण्याचे हिशोबी काम त्याला बिनचूक येत असूनहि नीतिधर्माकडे त्याची प्रवृत्ति होणे शक्य नाही. कारण कोणत्याहि सत्कार्याकडे प्रवृति होणें हा गुण शुद्ध मनाचा आहे, हिशेबी मनाचा नव्हे. हिशोब करणाच्या मनुष्याचा स्वभाव किंवा मन पहाण्याचे तुम्हांस कांहीं कारण नाही, त्यानें केलेला हिशोब बरोबर असला म्हणजे तेवढ्यानें कर्तव्याकर्तव्याचा निर्णय होऊन तुमचे काम भागतें, असें कोणी म्हणेल तर तेंहि खरें नाहीं. कारण सुख व दुःख म्हणजे काय हें सामान्यतः सर्वासच जरी कळत असले तरी सर्व प्रकारच्या सुखदुःखांचा तारतम्य हिशोब करितांना कोणत्या सुखदुःखाला किती किंमत द्यावयाची याचे माप प्रथम ठरावणे जरूर पडतें; आणि ही मोजदाद करण्यास उष्णतामापक यंत्रासारखें कोणतेंच निश्चित बाह्य साधन सध्यां किंवा पुढेहि उपलब्ध होण्याचा संभव नसल्यामुळे सुखदुःखांची योग्य किंमत ठरविण्याचे काम प्रत्येकास अखेर आपल्या मनानेंच करावें लागतें. पण ‘मी तसा दुसरा' ही आत्मौपम्यबुद्धि ज्याच्या मनांत पूर्ण जागृत झालेली नाहीं त्याला परक्याच्या सुखदुःखांचा तीव्रता नीट कळणे कधींच शक्य नसल्यामुळे, या सुखदुःखांची खरी किंमत त्यास करितां यत नाहीं; आणि मग तारतम्यनिर्णयार्थ त्यानें घेतलेल्या सुखदुःखांच्या किंमतीच्या रकमांतच साहजिकरीत्या फेर पडून त्यामुळे शेवटी सर्व हिशोब चुकण्याचा पुष्कळ संभव असतो. म्हणून “पुष्कळांचे पुष्कळ सुख पहाणे” या वाक्यांतील ‘पहाणे' या हिशोबी क्रियेस महत्त्व न देतां, तदर्थ ज्या आत्मैोपम्य व निर्लोभ बुद्धीनें पुष्कळ परक्यांच्या सुखदुःखांची यथार्थ किंमत प्रथम ठरवावी लागत्ये ती सर्वोभूती सम झालेली शुद्ध बुद्धिच नीतिमतेचे खरें बीज होय, असें म्हणणें अखेर भाग पडतें. नीतिमत्ता हा निर्मम, शुद्ध, प्रेमळ, सम किंवा थोडक्यांत सांगणे असल्यास, सत्त्वशील अंत:करणाचा धर्म आहे, नुस्त्या सारासारविचाराचे फल नव्हे. यासाठी भारती युद्धानंतर युधिष्ठिर राज्यारूढ होऊन पुत्रांच्या पराक्रमानें कृतार्थ झालली कुंती धृतराष्ट्राबरोबर वानप्रस्थाश्रम आचरण्यास जेव्हां वनास जाण्यास निघाली तेव्हां पुष्कळांचे कल्याण कर इत्यादि पाल्हाळ लावीत न बसतां “मनस्ते महदस्तु च” (मभा. आश्र. १७.२१)-बाबा ! तुझे मन नेहमी मोठे असू दे,-एवढेच तिनें युधिष्ठिरास शेवटी सांगितले आहे. पुष्कळांचे पुष्कळ सुख कशांत आह तें पहाणे एवढीच काय ती एक नीतिमत्तेची खरी, शास्रीय व सोपी कसोटी होय, असें ज्या पाश्चिमात्य पंडितांनीं प्रतिपादन केलेले आहे, त्यांनीं आपल्याप्रमाणेच इतर सर्व लोक शुद्ध मनाचे आहेत असें प्रथम गृहीत धरून मग नीतीचा निर्णय त्यांनीं कोणत्या तन्हेनें करावाहें त्यांस सांगितले आहे असें दिसतें. पण या पंडितांनी गृहीत घेतलेली ही गोष्ट खरी नसल्यामुळे नीतिनिर्णयाचे त्यांचे