पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६६ गीतारइंख्य अथवा कर्मथैोग म्हणज त्याच समीकरणाचे साख्य-कर्मयोग असें रूपातर होऊन गीतेंत साख्यमार्गच प्रतिपाद्य आह असे म्हणण्यास सवड सांपडत्ये. पण अशा रीतीनें केलेले अर्थ गीतेच्या उपक्रमोपसंहारांस अत्यंत विरुद्ध असून, गीतेंत कर्मयोग गौण आण संन्यास मुख्य समजणें, म्हणजे यजमानास त्याच्याच घरांतपाहुणा ठरवून पाहुण्यास यजमान करण्याइतकेंच असमंजस होय, हें आम्हीं या ग्रंथांत ठिकठिकाणीं व्यक्त करून दाखविले आहे; आणि त्यांतच निव्वळ वेदान्त, केवळ भक्ति किंवा नुस्ता पातंजलयेागच गीतेंत प्रतिपाद्य आहे या मतांचेंहि खंडन आलेले आहे. गीतंत नाहीं काय? वैदिक धर्मात मोक्षप्राप्तीचीं जीं जीं मुख्य साधनें किंवा मार्ग आहेत त्यांपैकी प्रत्येक मार्गातून कांहीं ना कांहं तरी भाग गौतेंत घेतला आहे; व इतकें करूनहि भूतभृन्न च भूतस्थो” (गी.९.५) या न्यायानेंगीतेतील खरेंरहुस्य पुनः या सर्व मार्गापेक्षां निराळेच आहे. ज्ञानाखेरीज मोक्ष नाहीं हें संन्यासमार्गातील म्हणजे उपनिषदांतील तत्त्व गतेिस ग्राह्य आहे; पण त्याची निष्काम कर्माशीं जोड घालून दिल्यामुळे गीतेंतील भागवतधर्माच्या पोटांतच यतिधर्माचाहि सहज समावेश झालेला आहे. तथापि संन्यास आणि वैराग्य यांचा अर्थ कर्मे सोडून द्यावीं असा न करिता, फलाशा सोडणें यांतच खरें वैराग्य किंवा संन्यास आहे असे सांगून उपनिषत्कारांच्या कर्मसंन्यासापेक्षां निष्काम कर्मयोग अधिक श्रेयस्कर असा गीताशास्रांत अखेर सिद्धान्त केला आहे. वेदविहित यज्ञयागादि कर्म केवळ यज्ञार्थ आचरिलीं तर बंधक नाहींत हें कर्मठ मीमांसकांचे मतहि गीतेस मान्य आहे; पण ‘यज्ञ' शब्दाचा अर्थ विस्तृत करून, फलाशा सोडून केलेलीं सर्व कर्मे हा एक मोठा यज्ञच होत असल्यामुळे वर्णाश्रमविहित सर्व कर्मे निष्काम बुद्धीनेंसदैव करीत रहाणें हें मनुष्यमात्राचें कर्तव्य होय, अशी गीतेनें त्यांत भर घातली आहे. उपनिषत्कारांच्या सृष्टयुत्पतिक्रमोपक्षां सांख्यांचा सृष्टयुत्पतिकम गीतेंत प्रधान धरिला आहे; तथापि प्रकृति आणि पुरुष येथेच मुक्काम न करितां सृष्टयुत्पतिक्रमाची परंपरा उपनिषदांतील नित्यपरमात्म्यापर्यंतनेऊन भिडविली आहे. अध्यात्मज्ञानकेवळ बुद्धीनें प्राप्त करून घेणें क्लेशाचे असल्यामुळे श्रद्धेनें व भक्तीनें तें प्राप्त करून घ्यावें असा जो वासुदेवभक्तीचा भागवत किंवा नारायणीय धर्मातील विधि तोहि गीतेंत वर्णिला आहे; परंतु या बावतीत देखील भागवतधर्माचा सर्वाशीं नक्कल न करितां वासुदेवापासून संकर्षण किंवा जीव उत्पन्न झाला हें भागवतधर्मातील जीवाच्या उत्पत्तीबद्दलचे मत वेदान्तसूत्रांप्रमाणें गीतेनेंहि त्याज्य ठरवून, भागवतधर्मातील भक्तीचा व उपनिषदांतील क्षेत्रक्षेत्रज्ञांबद्दलच्या सिद्धान्ताचा गीतेंत पूर्ण मेळ घालून दिला आहे. मोक्षप्राप्तीचे याखेरीज इतर साधन म्हटलें म्हणजे पातंजलयोग होय. पण पार्तजलयोग हेंच आयुष्यांतील मुख्य कर्तव्य असें जरी गीतेचे सांगणें नाही, तरी