पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, गीताध्यायसंगति ४६५ नसून उलट तोहि मोक्षप्रदच आहे असे म्हटले आहे. उघडच आहे कीं, सृष्टयारंभीं सनत्कुमारादिकांनीं व पुढे शुकयाज्ञवल्क्यांनी जो मागै स्वीकारिला त्यास भगवान् तरी सर्वथैवत्याज्य कसृा म्हणणार? जग्रांतील व्यवहार नीरस व गोड वाटणे हे कांहीं अंशीं प्रारब्धकमांनुसार प्राप्त झालेल्या उपजत स्वभावावर अवलंबून आहे; आणि ज्ञान झाले तरी प्रारब्धकर्म भोगिल्याखेरीज सुटत नाहीं हें पूर्वीच सांगितलें आहे. म्हणून या प्रारब्धकर्मानुसार प्राप्त झालेल्या उपजत स्वभावामुळे एखाद्या ज्ञानी पुरुषास संसाराचा मनापासून कंटाळा येऊन तो संन्यस्त झाल्यास त्यास नांवें ठेवण्यांत कांहीं हांशील नाहीं. आत्मज्ञानानें ज्या सिद्ध पुरुषाची बुद्धि निःसंग व पावत्र झाली तो दुसरें कांहीं करो वा न करो, मानव बुद्धीच्या शुद्धतेची कमाल, आणि निसर्गतःच विषयास लुब्ध होणा-या दुर्धर मनोवृत्तींस आपल्या ताब्यांत आणण्याचे पराकाष्ठचे मानवी सामथ्र्य, तो लोकांच्या प्रत्यक्ष नजेरस आणून देतो, ही कामगिरी लोकसंग्रहदृष्टयाहि कांहीं लहानसान नव्हे. संन्यासधर्माबद्दल लोकांत जी आदरबुद्धि आहे त्याचे खरें कारण हंच असून, तें गीतेसहि मोक्षदृष्टया संमत आह. पण नुस्त्या उपजत स्वभावाकडे म्हणजे प्रारब्धकमीकडेच लक्ष न देतां, ज्याला पूर्ण आत्मस्वातंत्र्य प्राप्त झालें अशा ज्ञानी पुरुषानें या कर्मभूमीत पुढे कसें वागावें याचा शास्रीयरीत्या विचार करूं लागलें म्हणजे कर्मत्यागपक्ष गौण होऊन सृष्टयारंभीं मरीच्यादिकांनी व पुढे जनकादिकांनीं आचरिलेला कर्मयोगच ज्ञानी पुरुषानें लोकसंग्रहार्थ स्वीकारला पाहिजे, असा गीतेप्रमाणे सिद्धान्त करावा लागतो. कारण, परमेश्वरनिर्मित सृष्टि चालविण्याचे कामहि ज्ञानी पुरुषानें केलें पाहिजे असें आतां न्यायतःच प्राप्त होतें; आणि या मार्गाँत ज्ञानसामथ्र्यातच कर्मसामथ्र्याची आविरोधानें भर पडत असल्यामुळे, हा कर्मयोग नुस्त्या सांख्यमार्गापेक्षां एकंदरीत अधिक योग्यतेचा ठरतो. सांख्य आणि कर्मयोग या दोन निष्ठांमध्यें मुख्य भेद कोणता याचा याप्रमाणे विचार केला म्हणजे सांख्य+निष्कामकर्म=कर्मयोग असें समीकरण निष्पन्न होऊन वैशंपायनानें म्हटल्याप्रमाणें गीतेंतील प्रवृत्तिपर कर्मयोगाच्या प्रतिपादनांतच सांख्यनिष्ठेच्या निरूपणाचा साहजिकरीत्या समावेश होऊन जातो (मभा.शां.३४८.५३) असें दिसून येईल; व त्यामुळेच गीतेवरील संन्यासमार्गीय टीकाकारांस आपला सांख्य किंवा संन्यास मार्गच गीतेंत प्रतिपाद्य आहे असें दाखविण्यास चांगली सवड झाली आहे. गीतेंतील ज्या लोकांत कर्म श्रेयस्कर ठरवून करण्यास सांगितले आहे, त्या लोकांकडे दुर्लक्ष केलें, अथवा ते सर्व अर्थवादात्मक म्हणजे आनुषंगिक प्रशंसात्मक आहेत असा आपल्या पदरचाच शेरा मारून किंवा दुसच्या कांहीं लटपटीनें वरील समीकरणांतून एकदां निष्कामकर्म उडवून टाकिलें, गी. र, ३०