पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति Yt w बुद्धि सम होण्यास ईद्रियनिग्रहाची जरूर असल्यामुळे तेवढ्यापुरता पातंजलयोगांतील यमनियमासनादि साधनांचा उपयोग करून घ्या, असें गीता सांगत आहे. सारांश,वैदिक धर्मात मोक्षप्राप्तीचीं जीं जीं साधनें सांगितली आहेत ती सर्व कर्मयोगाचे सांगोपांग विवेचन करितांना भगवद्गीर्तेत प्रसंगानुसार थोड्याबहुत अंशानें वर्णावीं लागलीं आहेत. हीं सर्व वर्णनें स्वर्तत्र मानिलों म्हणजे विसंगतता उत्पन्न होऊन गीतेंतील सिद्धान्त परस्परविरोधी आहेत असा भास होतो; व हा भास निरनिराळ्या सांप्रदायिक टीकांमुळे अधिकच दृढ होत असतो. परंतु ब्रह्मज्ञान व भक्ति यांची जोड घालून अखेर तद्द्वारा कर्मयोगाचे समर्थन करणे हाच गतेिचा मुख्य प्रातपाद्य विषय आहे असा आम्हीं वर सांगितल्याप्रमाणे सिद्धान्त केला, म्हणजे हे सर्व विरोध नाहीसे होऊन पूर्ण व्यापकदृष्टया तत्त्वज्ञानाशीं भक्तीचा व कर्मयोगाचा मेळ घालून देण्याच्या गीतंतील अलैौकिक चातुर्याचे आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाहीं. गंगेस दुस-या कितीहि नद्या येऊन मिळाल्या तरी गंगेचे स्वरूप त्यामुळे जसें भगत नाहीं तद्वतच गीतेचीहि गोष्ट आहे. तींत सर्व कांहीं असले तरी कर्मयोग हाच मुख्य प्रतिपाद्य विषय होय. परंतुकर्मयोग जरी याप्रमाणें मुख्य विषय आहे तरी कर्माबरोबरच मोक्षधर्माचे मर्महि यांत सुंदर रीतीनें निरूपिलें असल्यामुळे कार्याकायैनिर्णयार्थ सांगितलेला हृा गीताधर्मच--‘स हि धमैः सुपर्याप्तो ब्रह्मणः पदवेदन’ (मभा.अश्व.१६.१२)-ब्रह्मप्राप्त करून देण्यासहि पूर्ण समर्थ आहे, व या मार्गानें जाणारास मोक्षप्राप्त्यर्थ दुसरें कोणतेंहि अनुष्ठान करण्याची जरूर नाहीं, असें अनुगीतेच्या आरंभीं भगवंतांनी अर्जुनास स्पष्ट सांगितले आहे. व्यावहारिक सर्व कर्माचा त्याग केल्याखेरीज मोक्षप्राप्ति होणे शक्य नाहीं, असें प्रतिपादन करणाच्या संन्यासमार्गातील लोकांस हें म्हणणें रुचणार नाहीं हें आम्हीं जाणतों; पण त्यास आमचा इलाज नाहीं. गीताग्रंथ संन्यासमागीचा किंवा दुसच्या कोणत्याहि निवृतिपर पंथाचा नाहीं इतकेंच नव्हे, तर ज्ञानोत्तरहि कर्मसंन्यास कां करू नये याचे ब्रह्मज्ञानदृष्टया सयुक्तिक उत्तर देण्यासाठी गीतेची प्रवृत्ति झालेली आहे. म्हणून भगवद्गीतेस सुद्धां संन्यास देण्याच्या भरीस न पडतां संन्यासमार्गप्रतिपादक दुसरे जे वैदिक ग्रंथ आहेत तेवढयांवरच संन्यासमागीच्या अनुयायांनीं संतुष्ट राहिले पाहिजे. अथवा गतेिंत संन्यासमार्गालाहि भगवंतांनी ज्या निराभमान बुद्धीनें निःश्रेयस्कर म्हटले आहे त्याच समबुद्धीनें सांख्यमागॉयांनीं सुद्धां “जग चालावें असा परमेश्वराचा हेतु असून त्यासाठीच ज्या अर्थी तो वेळोवेळीं अवतार धारण करितो, त्या अर्थी ज्ञानोत्तर निष्कामबुद्धीनें व्यावहारिक कमें चालू ठेवण्याचा भगవ్రైశాకా ” असें म्हणणें हा सर्वात उत्तम पक्षु हृीय.