पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ६० गीतारहस्य अथवा कर्मयोग प्रकृति करित्ये, आत्मा कर्ता नव्हे, हें जाणिल्यानें कमें बंधक होत नाहींत” (१३. २९) असें कर्मयोगाचे आणि ‘ ध्यानेनात्मनि पश्यन्ति” (१३.२४) असें भक्तीचे सूत्र कायम राखिलें आहे. चवदाव्या अध्यायांत हेंच ज्ञान पुढे चालू असून एकच आत्मा अगर परमेश्वर एकत्र असतांहि सत्त्व, रज आणि तम या प्रकृतिगुणांच्या भेदामुळे जगांत वैचित्र्य कसें उत्पन्न होतें याचे सांख्यशास्राप्रमाणें वर्णन असून, जी हे प्रकृतीचे खेळ जाणितो व आपण कर्ता नाहीं हें ओळरवून परमेश्वराची भक्तियोगानें सेवा करितो तोच खरा त्रिगुणातीत किंवा मुक्त असें सांगितले आहे; व अखेरीस स्थितप्रज्ञ व भक्तिमान पुरुषाच्या स्थितीप्रमाणेच त्रिगुणातीताची स्थितिं अर्जुनाच्या प्रश्नावरून वर्णिली आहे. पंधराव्या अध्यायांत परमेश्वराचे कधी कधी वृक्षरूपानें जें वर्णन श्रुतिग्रंथांतून येतें त्याचे आरंभीं वर्णन करून, व सांख्य ज्याला ‘प्रकृतीचा पसारा' म्हणतात तो पसारा म्हणजेच हा अश्वत्थ वृक्ष होय असें सांगून, अखेर क्षर आणि अक्षर या दोहोंच्या पलीकडला जो पुरुषोत्तम त्याला जाणून त्याची भक्ति केल्यानें मनुष्य कृतकृत्य होते व त्याप्रमाणें तूं कर असा अर्जुनास उपदेश आहे. सोळाव्यांत प्रकृतिभेदामुळे जगांत जसें वैचित्र्य उत्पन्न होतें तद्वतच मनुष्यांमध्येंहि र्दवी संपत्तीचे व आसुरी संपत्तीचे असे दोन भेद होतात असें सांगून त्यांची कर्म कशीं असतात व त्यांना कोणकोणती गति प्राप्त होत्ये याचे वर्णन आहे. त्रिगुणात्मक प्रकृतीच्या गुणवैषम्यामुळे होणारें वैचित्र्य श्रद्धा, दान, यज्ञ, तप इत्यादिकांमध्येंहि कसें दृष्टीस पडतें याचे अर्जुनाच्या प्रश्नावरून सतराव्या अध्यायांत विवेचन असून, अखेर ॐतत्सत या ब्रह्मनिर्देशांतील तत् या पदाचा निष्कामबुद्धीनें केलेलें कर्म, आणि सत् या पदाचा चांगले परंतुकाम्यबुद्धीनें केलेलें कर्म, असा अर्थ करून हा सामान्य ब्रह्मनिर्देशहि कर्मयोगमार्गासच अनुकूल आहे असें दाखविलें आह. सारांश, जगांत चेोहॉकडे एकच परमेश्वर आह मग तो विश्वरूपदर्शनानें ओळखा किवा ज्ञानचक्षूंनी ओळखा, शरीरांत क्षेत्रज्ञहि तोच आणि क्षर सृष्टीत अक्षरहि तोच; तोच दृश्य सृष्टीत भरलेला पण तिच्याहि बाहेर किंवा पलीकडे आहे; ती जरी एक आहे तरी प्रकृतीच्या गुणभेदामुळे व्यक्त सृष्टीत नानात्व किंवावैचित्र्य आढळून येतें; आणि या मायेनें केिवा प्रकृतीच्या गुणभेदानेंच ज्ञान, श्रद्धा, तप, यज्ञ, धृति, दान यांचे किवा मनुष्यांमध्येंहि अनेक भद होतात: परंतु या सर्व भदांत जें ऐक्य आहे त ओळखून त्या एक व नित्य तत्त्वाच्या उपासननं-मग ती उपासना व्यक्ताची असो वा अव्यक्ताची असो-प्रत्येकानें आपली बुद्धि स्थिर व सम करून त्या निष्काम, सात्त्विक किंवा साम्य बुद्भीनेंच केवळ कर्तव्य म्हणून जगांतील स्वधर्माप्रमाणें प्राप्त झालेले सर्व व्यवहार केले पाहिजत, असें या सर्व म्हणजे अकरा अध्यायांचे तात्पर्य आहे. हें