पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति ४६१ ज्ञानविज्ञान या ग्रंथाच्या म्हणजे गीतारहस्याच्या पूर्वीच्या प्रकरणांतून आम्हीं सविस्तर प्रतिपादिले असल्यामुळे सातव्यापासून सतराव्या अध्यायांचा गोषवारा या प्रकरणांत अधिक विस्तृत दिला नाहीं. अध्यायसंगति पहाणे एवढाच प्रस्तुत उद्देश असल्यामुळे त्या कूमाला जरूर तेवढाच भाग येथे दिला आहे. कर्मयोगमागोत कभीपेक्षां बुद्धि श्रेष्ठ असल्यामुळे, ही बुद्धि शुद्ध व सम होण्यास अवश्य लागणारं परमेश्वराच्या सर्वव्यापित्वाचे म्हणजे सर्वभूतान्तर्गत आत्मै क्याचें “ज्ञानविज्ञान” सागण्यास सुरुवात करून, अधिकारभेदाप्रमाणे व्यक्ताच्या किंवा अव्यक्ताच्या उपासनेनें हें ज्ञान हृदयांत विबल्यावर बुद्धीला स्थयै व समता कशी प्राप्त होत्ये व त्यानेंच कर्म न सोडितांहिं अखेर मोक्ष कसा मिळतो याचे क्षराक्षर व क्षेत्रक्षेत्रज्ञ विचारपूर्वक एवढा वेळपथैत निरूपण केलें. तथापि बुद्धि याप्रमाणें सम झाल्यावर कर्माचा त्याग करण्यापेक्षां फलाशा सोडून लोकसंग्रहार्थ आमरणान्त कर्मच करीत रहाणें अधिक श्रेयस्कर असें भगवंतांनं निश्चयात्मक सांगितलें आहे (गी.५.२). म्हणून स्मृतिग्रंथांतून वर्णिलेला ‘संन्यासाश्रम'या कर्मयोगांतरहात नाही व त्यामुळे मन्वादि स्मृतिग्रंथांचा व या कर्मयोगाचा विरोध येण्याचा संभव आहे, अशा एक शंका मनांत येऊन 'संन्यास’ व ‘त्याग’ यांतील रहस्य काय तें मला सांगा असा अठराव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाचा प्रश्न आह. भगवान् यास असें उत्तर देतात कीं, संन्यास म्हणजे सोडणे असा मूळ अर्थ असल्यामुळे, व कर्मयोगमार्गात कमें सोडिलीं नाहीत तरी फलाशा सोडितात, म्हणून कर्मयोग हा तत्त्वतः संन्यासच होतो; कारण संन्याशाचा वय स्वीकारून भिक्षा मागितली नाही तरी बुद्धि निष्काम ठेवणे असें जें वैराग्याचे व संन्यासाचे स्मृत्युक्त तत्त्व तें कर्मयोगांतहि कायमच रहातें. पण फलाशा सुटली म्हणजे स्वर्गप्राप्तीचीहि आशा रहात नसल्यामुळे यज्ञयागििद श्रौत कर्म करण्याची जरूर रहात नाहीं अशी दुसरी एक शंकृा या ठिकाणी येत्ये. म्हणून सदर कर्म चित्तशुद्धिकारक असल्यामुळे तंीहि इतर कर्माबरोबरच पण निष्काम बुद्धीनॆ करून यज्ञचक्र लोकसंग्रह्मार्थ कायम ठेविले पाहिजे असें भगवंतांना आपलें निश्चित मत सांगितले आह. याप्रमाणें अर्जुनाच्या प्रश्नांचीं उत्तरें झाल्यावर ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति व सुख यांचे प्रकृतिस्वभावानुरूप सात्त्विक, राजस व तामस असे जे भेद होतात त्यांचे निरूपण करून गुणवैचित्र्याचा विषय पुरा केला आहे. नंतर यांपैकीं निष्काम कर्म, निष्काम कती, आसक्तिरहित बुद्धि, अनासक्तीपासून होणारें सुख आणि “अविभक्त विभक्तेषु” या न्यायानें होणारें आत्मैक्यज्ञान हींच सात्त्विक किंवा श्रेष्ठ ठरविल्यावर याच तत्त्वावर चातुर्वण्याचीहि उपपात देऊन, चातुर्वण्र्यधमनेिं प्राप्त झालेलीकमें सात्त्विक म्हणजे निष्काम बुद्धीनें केवळ कर्तव्य म्हणून करीत राहिल्यानेंच मनुष्य