पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति Yoኣዔ यापेक्षां या दोन साधनांत दुसरा कोणताहि भेद गीता करीत नाहीं. परमेश्वरस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन बुद्धि सम करणे असें जें कर्मयोगांतलें साध्य तें या दोन्ही साधनांनीं एकसारखेंच प्राप्त होतें. म्हणून व्यक्तोपासना ध्या किंवा अव्यक्तीपासना घ्या, दोन्हीहि भगवंतांस सारख्याच ग्राह्य आहेत. तथापि ज्ञानी पुरुषासहेि उपासनेची थोडीबहुत जरूर असल्यामुळे, चतुर्विध भक्तांत भक्तिमान् ज्ञानी श्रेष्ठ असे सांगून (गी.७.१७), ज्ञान व भक्ति यांजमधील विरोध भगवंतांनी काढून टाकेिला आहे. पण कांही झाले तरी ज्ञानविज्ञानाचे वर्णन चालू असतां प्रसंगानुसार एखाद्या अध्यायांत व्यक्तोपासनेचे तर दुसच्या अध्यायांत अव्यक्तोपासनेचे विशेष वर्णन येणें अपरिहार्य आहे परंतु तेवढ्यांमुळे ही पृथकू आहेत असा गैरसमज होऊं नये याच हेतूनें परमेश्वराच्या व्यूक्त स्वरूपाचे वर्णनू चालले असतां व्यक्त स्वरूपापेक्षां अव्यक्तेाची श्रेष्ठता, आणि अव्यताचे वर्णन चलिं असतां भक्ताची अवश्यकता सांगण्यास भगवान् विसरले नार्हात. तथाॉप विश्वरूपाच्या आणि विभूताच्या वर्णनांतच तानचार अध्याय खर्ची पडले असूल्यामुळे, या तीन चार अध्यायांस (पडध्यायास नव्हे) स्थूलमानानें ‘भरीि,मार्ग’ हें नांव देणेंच कोणास गोड वाटत असल्यास तसें करण्यास हरकत नाही. परंतु कांही म्हटलें तरी गीतेंत भक्ति व ज्ञान असा भद करून हे दोन मार्ग स्वतंत्र वर्णिले आहत असा याचा अर्थ होऊं शकत नाही हें निश्चित होय. साराश, कर्मयोगांत प्रधान असणारी साम्यबुद्धि प्राप्त होण्यास परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे ज्ञान झाले पाहिजे; मग हें ज्ञान व्यक्ताच्या उपासनेनें होवो वा अव्यक्ताच्या उपासनेनें होवो, सौलभ्याखेरीज त्यांत दुसरा भद नाही, हा या सर्व निरूपणाची इत्यर्थ असून सातपासून सतरा अध्यायांपर्यंतच्या सर्व विपयांस 'ज्ञानविज्ञान’ किंवा ‘अध्यात्म' असें एकच नांव गतेिंत दिले आहे, हे लक्षात ठेविले पाहिजे. असो; परमेश्वरच सर्व ब्रह्मांड किंवा क्षराक्षर सृष्टि व्यापून आहे असा विश्वरूपदर्शनानें अर्जुनाच्या चर्मचक्षूस’ प्रत्यक्ष अनुभव आणून दिल्यावर हाच परमेश्वर पिंडांत म्हणजे मनुष्याच्या शरीरात किंवा क्षेत्रांत आत्मा या रूपानें रहात असून या आत्म्याचे म्हणजे क्षेत्रज्ञाचें जें ज्ञान तेंच या परमेश्वराचेहि (परमात्म्याचें) ज्ञान होय असा क्षेत्रक्षेत्रज्ञविचार आतां तेराव्या अध्यायांत सांगितला आहे. पैकी प्रथम परमात्म्याचे म्हणजे परब्रह्माचे “अनादिमत्परं ब्रह्म०” इत्यादि उपनिषदांचे आधारें वर्णन केल्यावर पुढे हाच क्षेत्रक्षेत्रज्ञविचार ‘प्रकृति' आणि ‘पुरुष' या सांख्य विवेचनांत अंतर्भूत झालेला आहे असे दाखविले आहे; , आणि अखेर प्रकृति व पुरुष हा भद ओळखून सर्वगत निर्गुण परमात्मा ज्यानें “ज्ञानचक्षूनें” जाणिला तो मुक्त होतो असें वर्णन आहे. तथापि त्यांतहि “ सर्व कमें