पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७-गीता व खिस्ती बायबल 3 كم بها शेतकीसारखे निरुपद्रवी धंदे करीत. अविवाहित रहाणे, मद्यमांस वज्र्ये करणें, हिंसा न करणें, शपथ न घेणे, संघानें मठांत राहून कोणास कांहीं मिळकत झाल्यास ती सर्व संघाची सामाजिक मिळकत समजणें, वगैरे यांच्या पंथाचीं मुख्य तत्त्वें होतीं; व त्यांच्या मंडळींत कोणास शिरणे असल्यास तीन वर्षे उमेदवारी करून पुढे कांहीं शर्ती पाळण्याचे कबूल करावें लागत असे. यांचा मुख्य मठ मृतसमुद्राच्या पश्चिमकिनाच्यावर एंगदी येथे होता आणि तेथे ते संन्यासवृतीनें व शांततेनें रहात असत. खुद्द ख्रिस्त व त्याचे शिष्य यांनी एसी पंथाच्या मतांचे नव्या करारांत जे मान्यतापूर्वक निर्देश केलेले आहत(माथ्यू. ५.३४: १९.१२:जेम्स.५.१२;कृत्यें.४. ३२३५), त्यांवरून येशू ख्रिस्त याच पंथाचा अनुयायी होता, व या पंथाच्या संन्यासधर्माचाच त्यानें पुढे जास्त प्रसार केला असे दिसून येतं. परंतु ख्रिस्ताच्या संन्यासपर भक्तिमार्गाची परंपरा याप्रमाणें जरी एसी पंथास नेऊन भिडविली, तरी मूळ कर्ममय यहुदी धर्मौन संन्यासपर एसी पंथ तरी एकदम कसा निघाला याची कांही तरी सयुक्तिक उपपति सांगणें ऐतिहासिकदृष्टया जरूर आहे. ख्रिस्त एसीनपंथी नव्हता असें यावर कित्येकाचे म्हणणे आहे. पण हें जरी खरें मानिले तरी बायबलाच्या नव्या करारांत जो संन्यासपर धर्म वर्णिलेला आहे त्याचे मूळ काय किंवा कर्मप्रधान यहुदा धर्मात त्याचा एकदम प्रादुर्भाव कसा झाला हा प्रश्नटाळिता येत नाहीं; आणि एसीन पंथाच्या उत्पत्तीबद्दलच्या प्रश्नाऐवजों या प्रश्नाचे उत्तर द्यावें लागतें एवढाच काय तो भेद होते. कारण कोणतीहि गोष्ट एकदम कोटेंच उत्पन्न होत नसून तिची वाढ हळूहळू व बराच वेळ पूर्व होत असत्थे, आणि अशी वाढ जेथे नजेरस येत नाहीं ती गेष्टि प्रायः परकी देशांतून किंवा लोकांपासून घेतलेली असत्ये, असा समाजशास्राचा सामान्य सिद्धान्त आतां ठरलेला आहे. प्राचीन ख्रिस्ती ग्रंथकारांच्या लक्षांत ही अडचण आली नव्हती असें नाहीं. पण बुद्धधर्माची युरोपियन लोकास माहिती होण्यापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंतशोधक ख्रिस्ती विद्वानांचे असें मत होतें कीं, ग्रीक लोक व यहुदी लोक यांचा परस्परांचा निटक संबंध घडून आल्यावर ग्रीक लोकांच्या-विशेषतः पायथागोरसच्या-तत्त्वज्ञानामुळे कर्ममय यहुदी धर्मात एसी लोकांच्या संन्यासमार्गाचा प्रादुर्भाव झालेला असावा. अर्वाचीन शैौधाअंती ही सिद्धान्त खरा ठरत नाहीं. तथापि यज्ञमय यहुदी धर्मातच एकदम संन्यासपर एसी किंवा ख्रिस्ती धर्माचा उद्भव होणें स्वाभाविकरीत्या शक्य नसून त्याला यहुदी धर्माबाहेरचे दुसर कांहीं तरी कारण झालले आह, ही कल्पना नवा नसून इसवी सनाच्या अठराव्या शतकापूर्वी ख्रिस्ती पंडितांसहि ती मान्य झालेली होती, हें त्यावरून सिद्ध होतें पायथागोरस याचे तत्त्वज्ञान आणि बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञान यांमध्यें