पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* z * गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट विशेषतः विचारसादृश्याचा हा प्रश्न ज्यांनीं प्रथम उपास्थित केला त्यांनीं,-आनं दानं ब नि:पक्षपातबुद्धीनें पत्करणें हेंच न्याय्य व सयुक्तिक होय. यहुदी वायूबलांत म्हणजे बायबलाच्या जुन्या करारांत प्रतिपादिलेल्या प्राचनि यहुदी धर्मीत सुधारणा या नात्यानें नव्या करारांतील ख्रिस्तधर्म निघालेला आहे. यहुदी भाषेतदेवास'इलोहा’ (आरबूी'इलाह) असे म्हणतात. पण मोझेस यानें घालून दिलेल्या नियमांप्रमाणें यहुदी धर्मातील जें मुख्य उपास्य दैवत त्यास ‘जिहोव्हा' अशी विशिष्ट संझा आहे. ‘जिहोव्हा'हा शब्द मूळ यहुदी नसून खाल्दी भाषेतील ‘यव्हे’ (संस्कृत यह) या शब्दापासून निघाला आहे,असें पाश्चिमात्य पंडितांनीच आतां ठरविले आहे. यहुदी लोक मूर्तिपूजक नाहीत. अग्नींत पशुचे किंवा इतर द्रव्याचे हवन करून व देवानें घालून दिलेले धर्मनियम पाळून जिहोव्हास संतुष्ट करणे आणि तद्वद्वारा इहलोकी आपलें व आपल्या ज्ञाताचे कल्याण संपादन करणें, हा त्यांच्या धर्मीतील मुख्य आचार आहे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे वैदिक कर्मकांडाप्रमाणे यहुदी धर्महि यज्ञमय व प्रवृतिपर आहे असे म्हटलें पाहिजे. उलटपक्षीं ‘मला (हिसाकारक) यज्ञ नकोत, मी (ईश्वराची) कृपा चहातों’ (माथ्यू. ९.१३), 'देव व द्रव्थ ही दोन्ही साधणे शक्य नाही' (माश्रयू.६.२४), ज्याला अमृतत्वाची प्राप्ति करून घ्यावयाची असेल त्यानें वायकामुलें सेोडून देऊन माझा भक्त बनले पाहिजे’ (माथ्यू.१९.२१), असा ख्रिस्ताचा अनेक ठिकाणीं उपदश असून आपले शिष्य धर्मप्रसारार्थ जव्हां त्यानें देशांवर धाडिलें तेव्हां “तुम्ही जवळ सोनें, रुपें किंवा फाजील वस्रप्रावरणहि ठेवू नका,” इत्यादि संन्यासधर्माचे नियम पाळण्यास खिस्तानें त्यांस सागितले आहे(माथ्यू.१०.९-१३). अर्वाचीन ख्रिस्ती राष्ट्रांनी ख्रिस्ताच हे उपदश गुंडाळून ठेविले आहेत हें खरें; पण अलीकडील शंकराचार्य हत्ती घेोडे बाळगितात म्हणून शांकरसंप्रदाय ज्याप्रमाणे दरबारी होत नाहीं, तद्वतू अर्वाचीन ख्रिस्ती राष्ट्रांच्या या वर्तनामुळे मूळ ख्रिस्ती धर्महि तसाच म्हणजे प्रवृतिपर होता असें म्हणतां येत नाही. वैदिक धर्म मूळ कर्मकांडात्मक असतां त्यांत ज्याप्रमाणे पुढे ज्ञानकांडाचा उदय झाला, तद्वत् यहुदि व ख्रिस्ती धर्माचा संबंध आहे. पण वैदिक कर्मकांडांत ज्याप्रमाणे हळूहळू व क्रमाक्रमानें ज्ञानकांडांची व नंतर भक्तिपर भागवतधर्माची उपपात व वाढ शंकडों वर्षानीं होत गेली आहे, तशी ख्रिस्ती धर्माची गोष्ट नाहीं. ख्रिस्तापूर्वी फार झालें तर सुमारें दोनशें वर्षे एसी किंवा एसीन नांवाच्या सैन्याश्यांचा पंथ एकाएकींच यहुदि देशांत उद्भवला असें इतिहासावरून समजतें. हे एसी लोक यहुदि धर्माचे असले तरी हिंसात्मक यज्ञयाग सोडून देऊन ते आपला काळ निवाच्याच्या स्थळी परमेश्वराचे ध्यान करण्यांत घालवात असत; व पोटासाठी फारच झाले तर