पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*Aとゞ गीतारहस्य अथवा कर्मयेाग-परिशिष्ट पुष्कळ सादृश्य आहे असें कोलबुक यानें म्हटलें आहे;* म्हणून वरील सिद्धान्त खरा मानिला तरी एसीपंथाचे जनकत्व परंपरेनें हिंदुस्थानाकडेच येतें असे म्हणतां येईल. पण इतके आढेवेढे घेण्याचीहि आतां कांहा जरूर नाही. एसी किंवा ख्रिस्ती धर्माचे पायथागोरियन मंडळ्यांशीं जें साम्य आहे त्यापेक्षां केवळ एसी धर्माचेच नव्हे, तर खिस्तचारेत्र व ख्रिस्ताचा उपदेश यांचेंहि बुद्धाच्या धर्माशीं शतपट अधिक विलक्षण साम्य आहे, असें बौद्ध धर्मग्रंथ आणि बायबलाचा नवा करार यांची तुलना केली असतां स्पष्ट दिसून येतं. ख्रिस्ताला भूल पाडण्याचा सैतानानें ज्याप्रमाणे प्रयत्न केला, खिस्तास सिद्धावस्था प्राप्त होण्याचे वेळीं त्यानें ज्याप्रमाणें चाळीस दिवस उपोषण केलें, तद्वतच बुद्धास मारानें मोह पाडण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळीं बुद्धानें एकुणपन्नास दिवस (सात आठवडे) उपेोषण केले होतें असें बुद्धचरित्रांत वर्णन आहे. त्याप्रमाणें पूर्ण श्रद्धेच्या प्रभावानें पाण्यावर चालणें, चेह-याची अगर देहाची कान्ति एकदम सूर्यासारखी बनविणें, अथवा शरण आलेल्या चोरांस किंवा वेश्यांसहिं सद्गति देणे, इत्यादि गोष्टीहि वुद्ध व खिस्त या दोघांच्या चरित्रांत एकसारख्या असून, “तूं आपल्या शेजाच्यांवर किंवा वैच्यांवरहि प्रीति कर” वगैरे ख्रिस्ताचे जे मुख्य मुख्य नैतिक उपदेश तेहि कधी कधीं अगदीं अक्षरशः बौद्ध धर्मौत तत्पूर्वी आलेले आहेत. भक्तीचे तत्त्व मूळ बुद्धधर्मात नव्हतें; पण तेंहि पुढे म्हणजे ख्रिस्ताच्या पूर्वी निदान दोनतीन शतकें. महायान बौद्धपंथांत भगवद्गीतेवरून शिरलेलें होतें, असें वर सांगितलेच आहे. परंतु हें साम्य केवळ एवढ्याच गोष्ट्रीपुरतें नसून याखेरीज दुसच्या शेकडों लहानमोठ्या बाबतींत ख्रिस्ती व बौद्ध धर्मात अशाच प्रकारचे साम्य आहे, असें. मि. आर्थर लिली यांनी आपल्या पुस्तकांत साधार व्यक्त करून दाखविले आहे. किंबहुना ख्रिस्तास ‘कूसा’वर चढवून त्याचा वध केल्यामुळे ख्रिस्ती लोकांस, पवित्र व पूज्य झालेली कूसी'ची खूणहि स्वतिक’ या रूपानें वैदिक व बौद्ध धर्मातील लेोक ख्रिस्तापूर्वी शेकडों वर्षे शुभदायक मानीत होते; आणि ईजिप्त वगैरे पृथ्वीच्या जुन्या खंडांतील देशांसच नव्हे, तर कोलंबसापूर्वी कांहीं शतकें अमेरिकंतील पेरू व मेक्सिको देशांतहि स्वस्तिक चिन्ह शुभावह मानिले जात होतें, असें प्राचीन शोधकांनी ठरविले आहे.ां यावरून ख्रिस्ताच्या पूर्वीच सर्व लोकांस पूज्य झालेल्या स्वस्तिक चिन्हाचा ख्रिस्त भक्तांनी पुढे एका विशिष्ट रीतीनें उपयोग करून घेतला आहे असें अनुमान करावें लागतं. बौद्ध भिक्षु आणि जुने ख्रिस्ती धर्मेौपदेशक (विशेषतः पहिलेपाद्री) यांच्या

  • See Colebrooke's Miscellaneous Essays, Vol. I. pp. 399,400.

tSee Zhe Secret of the Pacific, by C. Reginald Enock, 1912, pp. 248-252.