पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३-गीता व बौद्ध ग्रंथ ५७९ सिलोन बेटांतले पाली भाषेत लिहिलेले जुने विनयपिटकादि बोद्ध ग्रंथ या परिषदेनंतरचे आहेत हें उघड दिसून येतें.* अशोकाचा पुत्र महेंद्र यानें इ. स. पूर्वी २४१ च्या सुमारास सिंहलद्वीपांत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली तेव्हां हे ग्रंथ तिकडे गेलेले आहत, व यानंतर सुमारें दीडशें वर्षानीं ते तिकडे प्रथमतः पुस्तकरूपानें लिहिले गेले, असें बौध्द ग्रंथकारांनीच म्हटले आहे. हे ग्रंथ तोंडपाठ करण्याची वहिवाट होती व त्यामुळे महेंद्राच्यावेळेपासून त्यांत कांहीं फरक झाला नसावा असें जरी मानिलें तरी बुध्दाच्या निर्वाणानंतर हे ग्रंथू प्रथम जव्हां तयार झालेतेव्हां, अगर पुढे महेंद्राच्या किंवा अशोकाच्या काळापर्यंत, तत्काली प्रचलित असलेल्या वैदिक ग्रंथांतून त्यांत कांहींच घेतलेले नाही असें म्हणतां येत नाहीं. म्हणून महाभारत बुध्दानंतरचे असले तरी तें अलेक्झाडर बादशहाच्या पूर्वीचे म्हणजे इ.स. ३२५च्या पूर्वीचे आहे असें अन्य प्रमाणांवरूनहि सिद्ध होत असल्यामुळे, मनुस्मृतीतल्या लोकांप्रमाणेच त्यांतील श्लोकहि महेंद्रानें सिलोन बेटांत नेलेल्या पुस्तकांत आढळून येणें कांहीं असंभवनीय नाही. सारांश बुद्धाच्या मरणानंतर त्याच्या धर्माचा प्रसार होत चाललेला पाहून लवकरच प्राचीन वैदिक गाथांचा व कथांचा महाभारतांत एकत्र संग्रह करण्यांत आलेला आहे, व त्यांतले जे लोक बौद्ध ग्रंथांत शब्दश: आढळून येतात ते बौद्ध ग्रंथकारांनीं महाभारतावरून घेतलेले आहत, महाभारतकारांनीं बौद्ध ग्रंथांतून घेतलेले नव्हेत, असें यावरून दिसून येतें. पण बौद्ध ग्रंथकारांनों हे श्वठोक महाभारतावरून न घेतां महाभारतास आधारभूत पण सध्यां लुप्त झालेल्या तत्पूर्वीच्या वैदिक ग्रंथांतून घेतलेले असतील व त्यामुळे महाभारताच्या कालाचा निर्णय वरील लोकसादृश्यावरून पूर्ण होत नाहीं असें जरी कदाचित् मानिले, तरी (१) केवळ अनात्मवादी व संन्यासपर मूळ बुद्धधर्मापासूनच पुढे क्रमाक्रमानें स्वाभाविकरीत्या भाक्तपर व प्रवृतिपर तत्त्वें निघण्याचा असंभव (२) महायान पंथाच्या उत्पत्तीसंबंधानें खुद्द बौद्ध ग्रंथकारांनींच केलेला श्रीकृष्णाचा स्पष्ट नामनिर्देश, (३) गीतेंतील भक्तिपर व प्रवृत्तिपर तत्त्वांचे महायान पंथांतील मतांशीं असणारं अर्थतः वशब्दतः सादृश्य, आणि (४) बैौद्ध धमांबरोबर तत्कालीं प्रचलित असलेल्या दुसच्या जैन किंवा वैदिक पंथांत प्रवृत्तिपर भक्तिमार्गाचा अभाव, या चार गोष्टींवरून बौद्ध धर्मात महायान पंथाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी भागवतधर्म चालू होता, इतकेंच नव्हे तर तेव्हां भगवद्गीता सर्वमान्य झालेली होती, व या गीतेच्या आधारेंच महायान पंथ निघालेला आहे, श्रीकृष्णप्रणीत गीतंर्ताल तत्त्वें बौद्ध धर्मातून घेतलेली नव्हेत, एवढे निःसंशय निष्पन्न होतें हल्लींच्या गीतेचा वर इतर प्रमाणांवरून जो कालनिर्णय केला आहे तो यांशी पूर्णपणें जुळत आहे. * See S. B. E. Vol. XI. Intro. pp. xv-xx and p. 58.