पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट به وايجا भगवद्गीतेवरूनच घेतलेले आहे, असें अनुमान करणें भाग पडतें. पण ही गोष्ट केवळ अनुमानावरच अवलंबून आहे असें नाहीं. तिबेटी भाषेत बौध्द धर्माच्या इतिहासावर बौध्दधमीं तारानाथ याचा जो एक ग्रंथ आहे त्यांत महायानपंथाच्या प्रमुख पुरस्कत्र्याचा म्हणजे ‘नागार्जुनाचा गुरु राहुलभद्र नांवाचा बुध्दधर्मी झालेला ब्राह्मण होता, व या ब्राह्मणास (महायान पंथांतल्या) कल्पना सुचण्यास ज्ञानी श्रीकृष्ण व गणेश कारण झाले” असें स्पष्ट लिहिले आहे; व दुस-या एका तिबेटी ग्रंथांत असाच उल्लेख आहे.* तारानाथाचा ग्रंथ फार प्राचीन नाहीं हें खरें; पण त्यांतील माहिती प्राचीन आधाराखेरीज दिलेली नाहीं हें सांगावयास नको. कारण, कोणीहि बौध्द ग्रंथकार स्वत:च्या धर्मपंथांतील तत्त्वें सांगतांना उगाच परधर्मीयांचा अशा रीतीनें उल्लेख करील हें संभवत नाहीं. यासाठी खुद्द बौध्द ग्रंथकारांनींच या बाबतींत श्रीकृष्णाचा जो हा स्पष्ट नामनिर्देश केला आहे ती महत्त्वाचा आहे. कारण, भगवद्गीतेखेरीज श्रीकृष्णोक्त दुसरा प्रवृतिपर भक्तिपंथ वैदिक धर्मात नसल्यामुळे महायानपंथ अस्तित्वांत येण्यापूर्वी भागवतधमैच नव्हे, तर भागवतधर्मावरील श्रीकृष्णोक्त ग्रंथ म्हणजे भगवद्गीताहिं तेव्हां प्रचारांत होती ही गोष्ट यावरून पुरी सिध्द होत्ये; व डॅॉ. कर्न यांचेहि मत असेंच आहे. गीता बुध्दधमीं महायानपंथाच्या पूर्वीची ठरल्यावर त्याबरोबर महाभारतहि तेव्हां असले पाहिजे असें अनुमान होतें. बुद्धाच्या मरणानंतर लागल,च त्याच्या मतांचा एकत्र संग्रह करण्यांत अाला असे बौद्ध ग्रंथांत म्हटले आहे खरें, पण हृल्लीं उपलब्ध असलेले अतिप्राचीन बौद्ध ग्रंथहि तेव्हांच झालेले असले पाहिजेत असें त्यावरून सिद्ध होत नाही. महापरिनिब्बाणसुत हा हल्लीच्या ग्रंथांपैकीं प्राचीन ग्रंथ मानितात. पण त्यांत पाटलिपुत्र शहरार्सबंधाचा जो उल्लेख आहे त्यावरून हा ग्रंथ बुद्धाच्या निर्वाणानंतर निदान शंभर वर्ष होण्यापूर्वी तरी झालेला नूसावा असें प्रो. व्हिसडेव्हिड्स यांनी दाखविले आहे; आणि बुद्धानंतर शंभर वर्षानीं बौद्धधर्माय भिक्षूंची दुसरी परिषद भरली होती, असें सांगून त्याचे वर्णन विनयपिटकांत चुल्लवग्गग्रंथाच्या अखेर दिलेले आहे. यावरून

  • See Dr. Kern's Mauual of Indian Buddhism, p. 122. “He (Nagarjuna was a pupil of the Brah iiiana Rahulabhadra, who himseh was a Mahayanist. This Brahmana was much indebted to the sage Krishna and still more to Ganesha This quassi historicas notice, reduced to its less allegorical expression, means that Mahayanism is much indebted to the Bhagavadgata and more even to Sh:valsm' ‘गणेश’ शब्दानें डॅी. केनै शैवपंथ समजतात असे दिसते. डॉ. केनै यांनीं प्राच्यधर्मपुस्तकमालेत सद्धमैपुंडरीक ग्रंथाचे भाषांतर केल असून त्याच्या प्रस्तावनंत हे Hå osi-fi sãqigotáš asso (S. B. E. Vol. XXI. intro. pp. xxv-xxviii)