पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Ҷ со गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट भाग ७-गोता च खिस्ती बायबल. हिंदुस्थानांत भक्तिपर भागवतधर्माचा उदय ख्रिस्तापूर्वी सुमारं १४ शतकें झालेला होता, आणि ख्रिस्तापूर्वी निघालेल्या मूळच्या संन्यासपर बौद्ध धर्मातप्रवृतिपर भक्तितत्त्वांचा प्रवश होण्यास बौद्ध ग्रंथकारांच्या मतेंच श्रीकृष्णप्रणात गीता कारण झालेली आहे, इत्यादि गोष्टी वर सांगितल्याप्रमाणें निश्चित झाल्यावर गीतेंतील बरेच सिद्धान्त ख्रिस्ती बायबलांत म्हुणजे बायबलाच्या नव्या करारांत आढळून येतात,अशी सबब दाखवून ख्रिस्ती धर्मातूनहीं तत्त्वें गीतंतघेतली असावी असें कित्येक पाद्री ग्रंथांतून जें प्रतिपादन कलेले असतें वृ विशेषतः डा. लॉरिनसर यांनी इ. स. १८६९ सालींप्रसिद्ध केलेल्या गीतेच्या जर्मन भाषांतरग्रंथांत जें प्रतिपादन केलें आहे, तें सर्व निर्मल आहे असें आपोआप सेद्ध होतें. लॉरिनसर यांनी आपल्या पुस्तकाच्या (म्हणजे गीतेच्या जर्मन भाषांतराच्या) अखेर भगवद्गीता आणि बायबलविशेषेकरून नवा करार--यांतील शब्दसादृश्याचीं सुमारें शंभरांहून अधिक स्थळे दाखविली असून त्यांपैकी कांहीं विलक्षण आणि मनन करण्यासारखीं आहेत. उदाहरणार्थ, “त्या दिवशी तुम्हांला कळून येईल कं, मी माझ्या बापांत, तुम्ही माझ्यांत आणि मी तुमच्यांत आहे” (जान १४.२०), हें वाक्य गीतेंतील “येन भूतान्यशॆषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथेो मयि” (गीता ४.३५), आाणि ‘‘यो मां पृश्यति सर्वत्र सर्वे च मथि पश्यति (गीं.६.३०) या वाक्यांशीं समानार्थकच नव्हे तर शब्दशःहेि एकच आहे असें म्हणण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणें जॉनमधील यापुढलें (१४.२१) म्हणजे “जेो माझ्यावर प्रीति कृरितो त्यावर मी प्रीति करितों” हें वाक्यहि गीतेंतील “प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थ अहं स च मम प्रेियः” (गी. ७. १७) या वाक्याशी सर्वाशीं सदृश आहे. या व दुसच्या अशाच प्रकारच्या अनेक सदृश वाक्यांवरून गीतकारांस बायबल माहीत होतें असें डॅी. लॉरिनसर यानीं अनुमान केले असून, गीता ख्रिस्तानंतर सुमॉर पांचशें वर्षांनी झाली असावी असे म्हटलें आहे. डेॉ. लॉरिनसर यांच्या पुस्तकांतील हा भाग ‘ईडियन अँटिक्वरी’ पुस्तक २ मध्ये त्यावेळी इंग्रजी भाषान्तराच्या रूपानं प्रसिद्ध झाला होता. आणि कै. तैलंग यांनीं भगवद्गीतचे जें पद्यात्मक इंग्रजी भाषान्तरकेलें आह त्याला जोडिलेल्या प्रस्तावनंत त्यांनी लॉरिनसरचे पूर्ण खंडन केले आहे.* डॅी. लॉरिनसर यांची गणना पाश्चात्य संस्कृतज्ञ पंडितांत होत नसून संस्कृतापेक्षां ख्रिस्ती धर्माचे त्यांचे ज्ञान व अभिमान ही अधिक होतीं. म्हणून त्यांची मतें केवळ कै. तेलंग

  1. See / 'hagavaagtta translated into English Blank Verse with Notes &c by K. T. Telang, 1875, (Bombay). This book is diffel ent from the translation in the S. B. E. Series.