पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६८ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट ब्रह्मा, इंद्र, महेश्वर, ईश्वर, यम, वगैरे अनेक वैदिक देवता व त्यांचे निरनिराळे स्वर्गादि अगर पातालादि लोक, यांचे ब्राह्मणधर्मात वर्णिलेलें अस्तित्वहिबुद्धास मान्य होतें; आणि त्याचमुळे नामरूपें कर्मविपाक, अविद्या, उपादान, प्रकृति वगैरे वेदान्त किंवा सांख्यशास्रांतील शब्द आणि ब्रह्मादि वैदिक देवांच्या कथांहि (बुद्धाचा श्रेष्ठपणा कायम राखून) थोड्या बहुत फरकानें बौद्ध ग्रंथांत नेहमी येत असतात. परंतु दृश्य सृष्टि नाशवंत व अनित्यं असून तिचे व्यवहार कर्मविपाकामुळे चालू आहेत, इत्यादि कर्मसृष्टीसंबंधाचे वैदिक धर्मातील सिद्धान्त बुद्धास जरी मान्य होते, तरी नामरूपात्मक नाशवंत सृष्टीच्या बुडाशीं नामरूपाव्यतिरिक्त आत्मस्वरूपी परब्रह्मासारखी एक नित्य व सर्वव्यापकं वस्तु आहे असा जो वैदिक धर्माचा अर्थात् उपनिषत्कारांचा सिद्धान्त तो बुद्धास कबूल नव्हता, हा या दोन धर्मातील महत्त्वाचा भेद आहे. आत्मा किंवा ब्रह्म वास्तविक नसून भ्रम असल्यामुळे, आत्मानात्मविचाराच्य़ा किंवा ब्रहृाचिंतनाच्या भानगडीत पडून कोणीहि आपला काल फुकट दवडूं नये, असें गौतमबुद्धानें स्पष्ट म्हटले आहे (सब्बासवसुत. ९-१३ पहा). आत्म्याची कोणतीहि कल्पना बुद्धास मान्य नव्हती हें दीघ्घनिकायापैकीं ब्रह्मजालसुतांतावरूनहि उघड होतें.* अात्मा व ब्रह्म एक का दीन इत्यादि प्रकारें आत्म्याच्या ६२प्रकारच्या निरनिराळ्या कल्पना सांगून त्या सर्व मिथ्या ‘दृष्टि'होत, असें या सुतांतांत म्हटले आहे; व मिलिंदप्रश्नांतहि बौद्धधर्माप्रमाणें “ आत्मा म्हणून काहीं खरी वृस्तु नाही” असें नागसेनानें ग्रीक मिलिंद (मिनांदर) यास स्वच्छ सांगितलें आह (मि. प्र. २.३.६व२.७.१५). आत्मा आणि तद्वतच ब्रह्म हीं दोन्ही भ्रम आहेत, खरी नव्हेत, असें मानिल्यावर वास्तविक म्हटलें म्हणजे धर्माचा पायाच ढांसळून पडतो. कारण, मग सर्व अनित्य वस्तुच शिल्लक राहून नित्य सुख किंवा त्याचा अनुभव घेणाराच कोणी कायम रहात नाहीं; आणि याच कारणास्तव हें मत श्रीशंकराचार्यानीं तर्कदृष्टयाहि अग्राह्य ठरविलें आहे. पण मूळ बुद्धधर्म काय एवढेच सध्यां आपणांस पहाणे असल्यामुळे, या वादांत येथे न शिरता बुद्धानें आपल्या धर्माची उपपति पुढे कशी लाविली आहे तें पाहूं. आत्म्याचे अस्तित्व बुद्धास जरी मान्य नव्हतें, तरी (१) कर्मविपाकामुळे नामरूपात्मक देहास ( आत्म्यास नव्हे) नाशवंत जगाच्या संसारांत पुनः पुनः जन्म घ्यावा लागतो, आणि (२) हा पुनर्जन्माचा फेरा किंवा एकंदर संसारच दुःखमय असून त्यांतून सुटका करून घेऊन कायमची शांति किंवा सुख प्राप्त करून घेणे जरूर

  • ब्रह्मजालसुताचे इंग्रजीत भाषान्तर झालेले नाही, पण त्याचा गोषवारा हिसडेfàşti qi=ff S. B. E Vol XXVI. Intro. pp. xxiii-xxv qă fèst srst त। पहा. - -