पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६-गीता व बौद्ध ग्रंथ ५६७ झालेले होते, हें निर्विवाद आहे. कारण, पाली भाषेतल्या प्राचीन बौद्ध धर्मग्रंथातच “चार वेद, वेदांगें, व्याकरण, ज्योतिष, इातहास, निघंटु” वगैरे विषयांत पारंगत असलेल्या कांहीं सत्त्वशील ब्राह्मण गृहस्थ, किंवा जटिल तपस्वी, यांशीं खुद्द गौतमबुद्धानें स्वतः वाद करून त्यांस आपल्या धर्माची दीक्षा दिली अशीं वर्णनें आहेत (सुत्तनिपातापैकीं सलसुतांतील सलाचे वर्णन व वथ्थुगाथा ३०-४५ पहा); आणि कठादि उपनिषदांतून (कठ,१.१८:मुंड,१.९.१०), किंवा त्यांना अनुसरून गीतेंत (२.४०-४५; ९.२०,२१) यज्ञयागादि श्रौत कर्माचा ज्याप्रमाणें हलकेपणा वर्णिला आहे, त्याचप्रमाणें व कांहीं अंशीं त्याच शब्दांनीं तविजसुतांत (त्रैविद्यसूत्रांत) बुद्धानेंहि ‘यज्ञयागादि' निरुपयोगी व त्याज्य ठरवून ब्राह्मण ज्याला ‘ब्रह्मसहृव्यताय’ (ब्रह्मसहृव्यत्यय=ब्रह्मसायुज्यता) म्हृणतात ती अवस्था कशिी प्राप्त होत्ये याचे आपल्या मताप्रमाणें निरूपण कंलें आहे. ब्राह्मणधर्मातील कर्मकांड व ज्ञानकांड-किंवा गार्हस्थ्यधर्म व संन्यासधर्म, अर्थात् प्रवृत्ति आणि निवृति-या दोन्ही शाखा पूर्णपणें रूढ झाल्यावर त्यांत सुधारणा करण्याच्या हेतूनें बौद्ध धर्म निघालेला आह हें यावरून उघड होतें. सुधारणा म्हटली म्हणजे त्यांत पूर्वीच्या कांहीं गोष्टी कायम रहातात व कांहीं बदलतात, असा सामान्य नियम आह. म्हणून या न्यायाप्रमाणे बोद्ध धर्मात वैदिक धर्मातील कोणत्या गोष्टी कायम ठेविल्या आहत व कोणत्या सोडिल्या आहेत याचा आतां विचार करूं. हा विचार गार्हस्थ्यधर्म व संन्यास या दोन्ही दृष्टीनों केला पाहिजे. पण बौद्ध धर्म मूळांत संन्यासमार्गाचा किंवा केवळ निवृतिपरच असल्यामुळे दोहॉकडाल संन्यासधर्माचा प्रथम विचार करून नंतर दोहोंकडील गार्हस्थ्यधर्माच्या तारतम्याचा विचार करूं. वेदिक संन्यासधर्म पाहिला तर असें दिसून येईल कीं, कर्ममय सृष्टींतील सर्व व्यवहार तृष्णामूलक अतएव दुःखमय असून त्यांतून म्हणजे जन्ममरणाच्या भवचक्रांतून आत्म्याची कायमची सुटका होण्यास मनु निष्काम व विरक्त करून तें दृश्य सृष्टीच्या बुडाशी असणाच्या आत्मस्वरूपी नेित्य परब्रह्माचे ठायीं स्थिर करणे व सांसारिक कर्माचा सर्वस्वीं त्याग करून या आत्मनिष्ठ स्थितीतच नेहमीं गढून रहाणे, हें त्यांतील मुख्य तत्त्व आहे. पैकी दृश्यसृष्टि नामरूपात्मक व नाशवंत असून तिचा अखंड व्यापार कर्मविपाकामुळे चालू राहिला आहे. कम्पना घत्तती लोको कम्मना वत्तती पजा (प्रजा) । कम्मनिबेधन सन्ति। (सस्वानि) रथस्साऽणीव यायती ॥ “कर्मानेंच लोक व प्रजाहि चालू आहे; चालता गाडा ज्याप्रमाणे रथाच्या कुणीनें नियंत्रित असतो, त्याप्रमाणें प्राणिमात्र कर्मानें बद्ध झालेला आह” (सुतनि. वासठसुत.६१),-हें वैदिकधमॉय ज्ञानकांडांतील तत्त्व, किंबहुना जन्ममरणाचा फेरा किंवा