पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६--मीता व बौद्ध ग्रंथ ५.६९ आहे, या दोन गोष्टी बुद्धास पूर्णपणें मान्य होत्या. सांसारिक दुःखाचे अस्तित्व व तें निवारण करण्याची आवश्यकता, या दोन गोष्टी याप्रमाणें कबूलकेल्या म्हणजे हें दुःख निवारण करून अत्यंत सुख प्राप्त करून घेण्याचा मार्ग कोणता हा वैदिक ील प्रश्न पुन: कायमच राहून त्यांचें कांहीं तरी समर्पक उत्तर सांगणें जरूर पडतें. यज्ञयागादि कर्मीनी भवचक्रांतून सुटका होत नाही असें उपनिषत्कारांनींच म्हटले आहे, व बुद्धानें यापुढे जाऊंन हीं सर्व कर्मे हिंसात्मक अतएव सर्वथैव त्याज्य व निषिद्ध होत असें सांगितलें आहे. तसेंच खुद्द ‘ब्रह्म' हाच जर एक मोठा भ्रम मानिला तर दुःखनिवारणार्थ ब्रह्मज्ञान हा मागैहि आतां भ्रांतिकारक किंवा असंभवनीय ठरतो. मृग दुःखमय भवचक्रांतून सुटण्याचा मार्ग कोणता ? बुद्धाचे याला असें उत्तर आहे कीं, एखादा रोग दूर करण्यास त्या रोगाचे मूळ काय तंठरवून तें मूलकारणच काढून टाकूण्याचा चांगला वैद्य ज्याप्रमाणें प्रयत्न करितो, त्याप्रमाणे सांसारिक दुःखाचा रोग दूर करण्यास (३) त्याचे कारण कायू तें समजूनयेऊन, (४) तें कारणचे जेणेकरून समूळ नाहीसें होईल असा मार्ग शहाण्या पुरुषानें पत्कारिला पाहिजे. पैकीं कारणांचा विचार करूं लागलें म्हणजे तृष्णा किंवा वासना हेंच या जगांतील सर्व दुःखाचे मूळ असून एका नामरूपात्मक देहाचा नाश झाल्यावर मागें अवशिष्ट रहाणाच्या या वासनात्मक बीजापासून दुसर नामरूपात्मकं देह् पुनः पुनः उत्पन्न ह्येीत असतात असॆ दिसून यतॆ, आाणि मग पुनर्जन्माच्या दुःखमय संसारांतून सुटका होण्यास इन्द्रियनिग्रहानें, ध्यानानें व वैराग्यानें तृष्णेचा पूर्ण क्षय करून संन्यासी किंवा भिक्षु बनणे हाच काय तो एक खरा मागै होऊन, यो वैराग्ययुक्त संन्यासानेंच कायमची शातेि व सुख प्राप्त होतें असें बुद्धानें ठरविले आहे. तात्पर्य, यज्ञयागादिकांच्या किंवा आत्मानात्मविचाराच्या भानगडींत न पडतां, सांसारिक दुःखाचे अस्तित्व, त्याचे कारण, त्याचा निरोध किंवा निवारणू करण्याची अवश्यकता, वतें समूळ नाहीसें करण्याचेवैराग्यरूप साधन-किंवा बौद्ध परिभाषेप्रमाणें अनुक्रमें दुःख, समुदय, निरोध व मार्गया चार दृश्य गोष्टींवरच बौद्ध धर्म उभारिला असून, आपल्या धर्माच्या या चार मूलभूत तत्त्वांस ‘आर्यसत्यें’ असें नांव बुद्धाने दिले आहे. उपनिषदांतील आत्मज्ञानाऐवजीं चार आर्यसत्यांच्या दृश्य पायावरच याप्रमाणें बौद्धधर्म जरी उभारिलेला आहे, तरी कायमची शांति किंवा सुखमिळविण्यास तृष्णेचा किंवा वासनचा क्षय करून मन निष्काम करण्याचा बुद्धानें उपदेशिलेला मार्ग (चवथे सत्य) आणि मोक्षप्राप्त्यर्थ उपनिषदांत वर्णिलेला मार्ग हे दोन्ही वस्तुत:एकच असल्यामुळे, दोन्ही धर्मात मनाची निर्विषय स्थितिहेंच अखेरचे दृश्य साध्य आहे हें उघड होतें पण ब्रह्म व आत्मा एक मानणारे उपनिषत्कार मनाच्या या निष्काम अवस्थेस ‘आत्मनिष्ठा'