पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग “-हल्लींच्या गातेचा काल اة ما ما नंतर सुमारें पांचशें वर्षानी, म्हणजे ख्रिस्तापूर्वीं सुमारें ९०० वर्ष, तोच मूळ भागवतुधर्म प्रतिपादन करणारें मूळ भारत व गीता प्रथम झालेली आहेत, आणि भारताचे महाभारत बनतांना यो मूळ गीतेंत तदर्थपोषक अशा जरी कांहा थोड्या किरकोळ सुधारणा झाल्या असल्या तरी गीतेचे एकंदर स्वरूप तेव्हांहेि बदलले गेले नाहीं, आणि हल्लींच्या महाभारतांत गीता गोंविली गेल्यानतर तांत पुनः दुसरा कांहीं फेरफार झालेला नाहीं व होणेंहि शक्य नव्हतें, अरों एकंदर विवेचनावरून दिसून येईल. मूळ गीता किंवा मृळ भारत यांच्या स्वरूपाबद्दलचा व कालाबद्दलचा हा निर्णय अर्थातच स्थूलमानानें व अंदाजानें केलेला आह. कारण त्यासाठी लागणारी सर्व माहिती सध्यां उपलब्ध नाही. पण हल्लीचे महाभारत व हल्लीची गीता यांची गोष्ट तशी नाही. त्यांचा कालनिर्णय व,रण्यास २१ध्यां बरीच राधनें सांपडतात. म्हणून त्याचा चर्चा पुढील भागांत स्वतंत्ररीत्या केलेली आहे. हल्लीची गीता व हल्लींचें महाभारत, म्हणजे मृळ स्वरूपांत कालान्तरानें फेर होत होत सध्यां ज्या स्वरूपांत गीता व महाभारत आपणास उपलब्ध आहेत ते ग्रंथ होत, तत्पूर्वीचे मूळ ग्रंथ नव्हेत, हें वाचकांनीं या ठिकाणीं ठक्षांत ठेविले पाहिजे. भाग ५--हृल्लाच्या गातेचा काल. भगवद्गीता हा भागवतधर्माचा प्रधान ग्रंथ असून, हा भागवतधर्म ई.स. पूर्वी सुमारें चवदाशें वर्ष व त्यानंतर कांहा शतकांनी मूळ गीता निघालेली असावी असें स्थूलमानानें वर ठरविलें आणि मूळ भागवतधर्म निष्कामकर्मप्रधान असतां त्याचेच पुढे भक्तिप्रधान रूपान्तर होऊन अखेर विशिष्टाद्वैताचाहित्थात कसा समावेश झाला हें सांगितलें. मूळ गीतेबद्दलची किंवा मूळ भागवतधर्माबद्दलची यापेक्षां जास्त माहिती निदाने सध्यां तरी सांपडत नहीं; आणि पांचपन्नास वर्षापूर्वीं हल्लींचे महाभारत व हल्लींचा गीता यासंबंधानेंहिं असाच प्रकार होता. पण डॅी. भांडारकर कै. कूाशीनाथपंततेलंग, कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित आणि रावबहादूर चिंतामण राव वैद्य वगैरेंच्या उद्योगानें हल्लींच्था भारताचा व हल्लींच्या गीतेंची काल टरविण्यास बरींच प्रमाणें आतां उपलब्ध झाली आहेत; व अगदीं अलीकडे दुसरीहिं एकदोन प्रमाणें कै. त्र्यंबक गुरुनाथ काळे यानी दाखविलीं आहेत ही सर्व एकत्र करून, व आमच्या समजुतीप्रमाणे त्यांत जी भर घालावयास पाहिजे ती घालून, परिशिष्टाचा हा भाग संक्षिप्त रीतीनें लिहिला आह. या परिशिष्टप्रकरणाच्या आरंभींच हल्लीचे महाभारत आणि हल्लींची गीता हे दोन्ही ग्रंथ एकाच्याच हातचे असाव हें आम्हीं सप्रमाण दाखविलें आहे. हे दोन्ही ग्रंथ एकाच्या हातचे अर्थात् एककालीन मानिले, म्हणजे महाभारताच्या कालावरून गीतेच्या कालाचाहि सहज निणय होतो. म्हणून या भागांत हल्लींच्या महाभारताचा काल ठरवि