पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहृ२य अथवा क्रमैयोग:- एग्ािद्भाग्ट بنمایه संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध याप्रमाणें चार व्यूहाचा, तर काही त्रिव्यूह, द्विव्यूह अगर एकव्यूह मानितात असें स्पष्ट म्हटले आहे (मभा.शां.३४८.५७); आणि अशाच प्रकारचे दुसरे हि कांही मतभेद पुढे निघालेले असतील, नाही असें नाही तसेच औपनिषदिक व सांख्य ज्ञानाचीहि वाढ होत चाललीच होती म्हणून मळ गीतंत कांही विस्खलितपणा असल्यास तो काढून टाकृन वाढत्या fपडब्रह्मांडज्ञानाशी भागवतधर्माचा पुरा मळ राहील अशी खवरदारी घेणे अस्वाभाविक किंवा मूळ गातेच्या हेतूसहि विरुद्ध नव्हतें; व त्याचमुळे हल्लीच्या गीतेत ब्रह्मसूत्राचा उल्लेख आलेला आहे हें वर “ गीता व ब्रह्मसूत्रे” या सदराखाली दाखविले आहे. याशिवाय अशा प्रकारचे दुसरेहि कृांहीं फरक मृळ गीतेंत झाले असतील तथापि मूळ गीताग्रंथांत अशा प्रकारचे फेरफार देखील फार होणे शक्य नव्हते. गीतेचे हृल्ली जे प्रामाण्य आहे तें तिला हल्लीच्या महाभारतानंतर आले आहे असें दिसत नाहीं. ब्रह्मसूत्रांतच ‘स्मृति’ या शब्दानें गीता प्रमाणार्थ घेतलेली आहे हें वर सांगितले आहे. मूळ भारताचे महाभारत होतांना मूळच्या गीतेंत जर पुष्कळच फरक झाला असूतां, तर या प्रामाण्यास धेोका आल्याखेरीज राहिला नसता. पण तसें न होतां हें प्रामाण्य आधिकच वाढले आहे. म्हणून मूळच्या गीतेंत जी कांही फरक झाला असेल तो महत्त्वाचा नसून, मूळांतील अर्थाचा ज्यानें परिपोप होईल अशा प्रकारचाच तो असला पाहिजे, असें अनुमान करणे भाग आहे. गीतेला एकदां याप्रमाणे जें स्वरूप प्राप्त झालें तेंच आतांपर्यंत कायम आहे, पुढे पुनः त्यांत कांहीं फरक झालेला नाहीं, असें निरनिराळ्या पुराणांतून हल्लीच्या भगवद्गीतेच्या धर्तीवर ज्या अनेक गीता सांगितल्या आहेत त्यांवरून उघड होतें. कारण, या सर्व पुराणांतील अतिप्राचीन पुराणापूर्वी कांहीं शतकें तरी हल्लीची गीता जर पूर्ण प्रमाणभूत अतएव फिरवितां न यण्यासारखी झालली नसती, तर तिच्या नमुन्यावर दुस-या गीता सांगण्याची कल्पनाच मनांतयेणें संभवनीय नव्हतें. तसेंच गतिच्या निरनिराळ्या सांप्रदायिक टीकाकारांनी एकच गीतेतील शब्दांची ओढाताण करून गीतार्थ आपआपल्या संप्रदायास अनुकूल आहे असे दाखविण्याची जी खटपट केली आहे तीहि करण्याचे एरवीं कांहीं कारण नव्हतं. हल्लीच्या गीतंतील कांहीं सिद्धान्त परस्परविरोधी भासतात या सबबीवर हल्लीच्या महाभारतांतील गीतंतहि पुढे वेळोवेळी फरक झाला असेल अशी शंका कित्येक काढीत असतात. पण हे विरोध वास्तविक नसून धर्मप्रतिपादन करणाच्या पूर्वापर वैदिक पद्धतीचे स्वरूपनीट लक्षांत न आल्यामुळे उत्पन्न होणारा हा भ्रम आहे, असें आम्हीं आरंभीच सांगितले आह. सारांश, निरनिराळ्या प्राचीन वैदिक धर्मागांची एकवा. क्यता करून प्रवृत्तिमार्गाचे विशेष समर्थन करणाच्या भागवतधर्माच्या उदया.