पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय व गीता به ایفا यापेक्षांहि लवकर तयार झालेले आहत. आतां आप महाकाव्य म्हटलें म्हणजे नायकाच्या नुस्त्या पराक्रमाचेच त्यांत वर्णन केल्यानें काम भागत नाहीं; नायक जें कांही करितो तें योग्य का अयोग्य हेंहि सांगावें लागते. किबहुना आर्ष महाकाव्याचा हा एक मुख्य भाग असतो असें संस्कृताखेरीज इतर वाङ्मयांतील अशा प्रकारच्या महाकाव्यांवरूनहि दिसून येतें. अर्वाचीनदृष्टया पाहिले तर नायकांच्या कृत्यांचे हें समर्थन शुद्ध नीतिशास्त्रदृष्ट्या केलं पाहिजे. पण प्राचीनकाळीं धर्म व नीति असा पृथकू भद झाला नसल्यामुळे हें समर्थन करण्यास धर्मदृष्टीखेरीज दुसरा मार्ग नव्हता; आणि मग भारतांतील नायकांस ग्राह्य झालेला किंवा त्यांनींच प्रवृत्त केलेला जी भागवतधर्म त्याच्या आधारेंच त्यांच्या कृत्यांचे समर्थन करणे जरूर होतें हें सांगावयास नको. पण याशिवाय दुसरेंहि असें कारण आहे की, भागवतधमीखेरीज तत्काळी प्रचलित असलेले दुसरे वैदिक धर्मपंथ थोडेवहुत किंवा सर्वाशीं निवृतिपर असल्यामुळे त्यांतील धर्मतत्त्वांच्या आधारें भारतांतील नायकांच्या पराक्रमी कृत्यांचे पूर्ण समर्थन होणेंहि शक्य नव्हतं. म्हणून महाकाव्यात्मक मूळ भारतांतच कर्मयोगपर भागवतधर्माचे निरूपण करणें भाग होतें. हीच मूळ गीता होय; आणि भागवतधर्मीचे मूळ स्वरूप सोपपतिक प्रतिपादन करणारा हा अगदीं पहेिला नसला तरी आदिॐथापैकंा एक ग्रंथ असून त्याचा काल रित्रस्ताधूयी सुमारें ९९० वर्ष असावा असें ढोबळ अनुमान करण्यास आम्हांस काही हरकत दिसत नाहीं. गीत हा अशा रीतीनें भागवतधर्मावरील पहिला नसला तरी मुख्य ग्रंथ असल्यामुळे, त्यांत प्रतिपादन केलेला निष्काम कर्मयोग तत्काली प्रचलित असलेल्या इतर धर्मग्रंथांशीं--म्हणजे कर्मकांडाशी, औपनिषदिक ज्ञानाशा, सांख्यांशीं, चित्तनिरोधरूपी योगाशी आणि भक्तीशींहि-अविरुद्ध आहे, असें दाखविणे जरूर होतें; किंबहुना हेंच या ग्रंथांचे मुख्य प्रयोजन होतें, असं म्हटलें तरी चालेल. वेदान्त व मीमांसा ही पद्धतशीर शास्ने पुढे निघाली असल्यामुळे, मूळ गोतंत त्यांचे प्रतिपादन येऊं शकत नाही, व म्हणून गर्तित वेदान्त मागाहून घुसडलेला अहे अशी शंका कित्येक काढतात. पण पद्धतशीर वेदान्त व ममासा हॉ शाखें जरी मागाहून बनली असली तरी त्यांतील प्रतिपाद्य विषय फार प्राचीन आहेत हें वर सागितलें आहे. म्हणून हे विषय मूळ गीतंत येण्यास कालदृष्टया कांहीं प्रत्थवाय येत नाहीं. तथापि मूळ भारताचे जव्हां महाभारत बनविलें तेव्हां मूळच्या गीतेत बिलकुल फरक झाला नसेल असंहिं आम्ही म्हणत नाहीं कीणताहिं धर्मपंथ घेतला तरी त्यात वेळेोवळीं मतभेद होऊन अनेक उपपंथ निर्माण होतात, असें इतिहासावरून दिसून येतें. भागवतधर्मास सुद्धां हाच न्याय लागूं आहे. नारायणीयेोपाख्यानांतच काही लोक भागवतधर्म चतुव्यूंह म्हणजे वासुदेव