पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

VA\Ao गीतारहस्य अथवा कर्मयोग–परिशिष्ट लक्षण’ आहे असें भागवतांत म्हटले आह. (भाग.१.३.८ व११.४.६); व नंतर या नैष्कम्यैधर्मात भक्तीला द्यावें तितकें प्राधान्य दिलें नसल्यामुळे भक्तिपर भागवतपुराण सांगावें लागलें असं म्हटलें आह (भाग,१.५.१२). यावरून मूळ भागवतधर्म नैष्कम्र्यप्रधान म्हणजे निष्कामकर्मप्रधान असून पुढे कालान्तरानें त्याचे स्वरूप पालटून तो भक्तिप्रधान झाला असें निर्विवाद सिद्ध होतें. ज्ञान व भक्ति यांशीं पराक्रमाची नित्य जोड ठेवणाच्या मूळ भागवतधर्मात व आश्रमव्यवस्थारूपी स्मार्तमार्गात भद काय, केवळ सैन्यासपर जैन व बौद्ध धर्माच्या प्रसारानें भागवतघर्मातील कर्मयोग मार्गे पडून त्यास दुसरे म्हणजे वैराग्ययुक्त भक्तिस्वरूप कसें प्राप्त झालें, आणि बौद्ध धर्माच्या -हासानंतर जे वैदिक संप्रदाय प्रवृत्त झाले त्यांपैकीं कांहींनीं भगवद्गीतसच अखेर संन्यासपर तर कांहीनों केवळ भक्तिपर, आणि कांहानी विशिष्टाद्वैतपर स्वरूप कसें दिलें, इत्यादि ऐतिहासिक प्रश्नांचे विवेचन गीतारहस्यांत मागेंच केले असल्यामुळे त्याची येथे द्विरुक्ति करीत नाहीं वैदिक धर्माच्या सनातन प्रवाहांत भागवतधर्म केव्हां उदयास आला, व प्रथम तो प्रवृत्तिपर किंवा कर्मप्रधान असतांहेि त्याला पुढें भक्तिप्रधान व अखेर रामानुजाचायोच्या काले विशिष्टाद्वैती स्वरूपहि कसें आले, हें वरील संक्षिप्त विवेचनावरून कळून येईल. भागवतधर्माच्या या निरानराळ्या स्वरूपांपैकी अगदीं मूळारंभींचे म्हणजे निष्कामकर्मपर जें स्वरूप तेंच गीताधर्माचे स्वरूप होय. आतां अशा प्रकारच्या मूळच्या गीतेच्या कालाबद्दल काय अनुमान करितां येण्यासारखें आहे तें थोडक्यांत सांगतें. श्रीकृष्ण आणि भारती युद्ध यांचा काल जरी एकच म्हणजे खिस्ती सनापूर्वी सुमारें १४०० वर्षे असला, तरी मूळ गीता व मूळभारत असे जे भागवतधर्माचे दोन प्रधान ग्रंथ ते त्याच कालीं झाले असतील असें म्हणतां येत नाहीं. कोणताहि धर्मपंथ निघाल्यावर लागलाच त्यावरील ग्रंथ तयार होतात असे नाहीं; आणि भारत व गीता यांसहि तीच न्याय लागूं पडतेो. भारती युद्ध झाल्यावर पाडवांचा पणतू जो जनमेजय त्यानं केलेल्या सर्पसत्रांत वैशपायनानें त्यास गीतेसहित भारत प्रथम सांगितले, व तेंच सौतीनें शौनकास सांगेितल्यावर तेथून पुढे भारताची प्रवृत्ति झाली, अशी कथा हृल्लींच्याच महाभारताच्या प्रारंभीं दिली आहे. सौति आदिकरून पौराणिकांच्या मुखांतून सुटून यापुढे भारतास काव्यमय ग्रंथांचे स्थायिक स्वरूप येण्यास मध्यंतरीं कांहीं काळ लोटला असला पाहिजे हें उघड आहे. परंतु तो किती हें निश्चितपणें ट्रावण्यास आतां कांहीं साधन नाही. तथापि भारती युद्धानंतर सुमारें पांचशे वर्षोंच्या आंतच आर्ष महाकाव्यात्मक मूळ भारत निर्माण झाले असावे असें मानिल्यास त्यांत कांहीं साहस केल्यासारखे होणार नाही. कारण, बौद्ध धर्माचे ग्रंथ बुद्धाच्या मरणानंतर