पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय व गीता ५४ ९ केली तरी ती एका भगवंतांस पॉचत्ये, आणि रुद्र आणि भगवान् दोन नव्हेत, असें गीतेंत आणि नारायणीयोपाख्यानांतहि वर्णन आहे (गी.९.२३; मभा. शां ३४१. २०-२६ पहा). म्हणून नुस्ती वासुदेवभक्तिहेंच भागवतधर्माचे मुख्य लक्षण मानितां येत नाही. ज्या सात्वतज्ञातींत भागवतधर्माचा प्रादुर्भाव झाला त्यातील सात्यकि आादिकरून पुरुषं, परम भगवद्भक्त भीष्मार्जुन, आाणि स्वतः श्रीकृष्णहेि पराक्रमाच्या अनेक उलाढाली करणारे व करविणारे होते. यासाठीं हाच कित्ता इतर भगवद्भक्तांनीहि गिरवून तत्काली प्रचारांत असलेलीं चातुर्वण्याप्रमाणें युद्धादि व्यावहारिक कर्म करावी हा मूळ भागवतधर्मातील मुख्य विषय होता. भक्तीचे तत्त्व स्वीकारून वैराग्ययुक्त तीव्रबुद्धीनें संसाराचा त्याग करणारे विरक्त पुरुष तव्हांहि अगदीच नसतील असें नाहीं. पण हें कांहीं सात्वतांच्या किंवा श्रीकृष्णाच्या भागवतधर्माचे मुख्य तत्त्व नव्हे. भक्तीनें परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर भगवद्भक्तानें परमेश्वराप्रमाणे जगाच्या धारणपोषणार्थ झटलें पाहिजे हें श्रीकृष्णाच्या उपदेशाचे सार आहे. पैकीं ब्रह्मज्ञानी पुरुषानेंहि निष्काम कर्म करण्यास हरकत नाहीं असें उपनिषत्कालीं जनकादकांनीच ठरविलें होतें. पण त्या वेळीं भक्तीचा त्यांत समावेश झालेला नसून शिवाय ज्ञानोत्तर् कर्म करणे किंवा न करणे ही गोष्ट तेव्हां ज्याच्या त्याच्या खुषीची म्हणज वैकल्पिक मानीत असत(वे.सू.३.४.१५).भागवतधर्मानें यापुढें धांव घेऊन शुद्ध निवृत्तीपेक्षां निष्कामकर्मपरं प्रवृत्तिमार्ग (नैष्कम्र्य) अधिक श्रेयस्कर ठराविला, आणि ज्ञानाशींच नव्हे तर भक्तीशीहि कर्माची योग्य जोड घालून दिली, ही वैदिकधर्माच्या इतिहासांतालत्याची महत्त्वाची आणि स्मार्तधर्मापेक्षां निराळी कामगिरी होय. या धर्माचे मूळ प्रवर्तक जे नरनारायणऋषि तेहि याचप्रमाणें सर्वकर्मे निष्कामबुद्धीनें करणारे होते व सर्वानीं त्यांच्याप्रमाणे कर्मच करणे जरूर आहे, असें महाभारतांत एके ठिकाणीं म्हटले असून (मभा.उद्यो.४८.२१, २२), नारायणीयाख्यानांत तर “प्रवृत्तिलक्षणश्चैव धर्मेौ नारायणात्मक.”(मभा.शां. ३४७.८१),-नारायणीय किंवा भागवत धर्म प्रवृत्तिपर म्हणजे कर्मपरआहे,-असें त्याचे स्पष्ट लक्षण सांगितले आहे. नारायणीय किंवा मूळ भागवत धर्मातील जें हें निष्काम प्रवृत्तीचे तत्त्व यासच नैष्कम्र्य हें नांव आहे, व हेंच मूळ भागवतधर्मोतील मुख्य तत्त्व होय. पण पुढे कालान्तरानें हें तत्त्व मंदावत जाऊन, वैराग्यपर वासुदेवभक्ति या धर्मात प्रधान मानूं लागले असें भागवतावरून दिसून येतें; आणि नारदपंचरात्रांत तर भक्तीबरोबरच मंत्रर्तत्रांचाहि भागवतधर्मौत समावेश केला आहे. तथापि हीं या धर्माची मूळचीं स्वरूपें नव्हेत असें भागवतावरूनच उघड होतें. कारण, नारायणीय किंवा सात्वत धर्माबद्दल बोलण्याचा जेथे प्रसंग आला तेथे सात्वताचा किंवा नारायणऋषीचा (म्हणजे भागवत) धमै ‘नैष्कम्ये