पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"Yと गीतारहस्य अथवा कमैयेोग-परिशिष्ट उपदशकेला त्यांच्यांत तत्कालीं धार्मिक तत्त्वज्ञानाचा प्रसार झालेला नसल्यामुळे, ख्रिस्ताला आपल्या धर्माची तत्त्वज्ञानाशीं जोड घालून देण्याची कांहा जरूर नव्हती. बायबलाच्या जुन्या करारांत जो कर्ममय धर्म वर्णिला आहे त्याला जोडूनच आपला भक्तिमार्ग आहे, एवढे दाखविल्यानें ख्रिस्ताचे काम भागत होतें; व तेवढाच प्रयत्न त्यानें केला आहे. पण ख्रिस्ती धर्माच्या या हकीकतीशीं भागवतधर्माची ऐतिहासिकदृष्टया तुलना करितांना भागवतधर्म ज्या लोकांत ज्या कालीं प्रवृत झाला त्या लोकांत त्या कालीं केवळ कर्ममार्गीचीच नव्हे तर ब्रह्मज्ञानाची व कापिलसांख्यशास्राचीदेखील पुरी ओळख होऊन या तिन्ही धर्माची एकवाक्यता करण्यासहि तेव्हां ते शिकलेले होते, हें विसरतां कामा नये. अशा लोकांस “तुमचे कर्मकांड, किंवा औपनिषदिक व सांख्य ज्ञान, गुंडाळून ठेवा आणि केवळ श्रद्धेनेंच भागवतधर्म स्वीकारा” असें सांगणें समंजस झालें नसतें. ब्राह्मणादिवैदिक ग्रंथांत वर्णिलेल्या व तत्कालीं प्रचलित असलेल्या यज्ञयागादि कर्माचे फल काय, उपनिषदांतील किंवा सांख्यशास्रांतील ज्ञान व्यर्थ आहे काय, किंवा भक्तीचा आणि चित्तनिरोधरूपी योगाचा मेळ कसा बसतो, इत्यादितेव्हां साहजिकरीत्या उद्भवणा-या प्रश्नांची नीट उत्तरें दिल्याखेरीज भागवतधर्माचा प्रसार होणेच शक्य नव्हतें. म्हणून या सर्व विषयांची चर्चा भागवतधर्मात अगदीं पहिल्यापासूनच करणें अवश्य होतें असें न्यायतः प्राप्त होतें; आणि महाभारतान्तर्गत नारायणीयोपाख्यानावरूनहि तोच सिद्धान्त दृढ होतो. या अाख्यानांत भागवतधमोचा औपनिषदिक ब्रह्मज्ञान व सांख्य क्षराक्षराविचार या दोहींशीहि मेळ घातला असून “चार वेद आणि सांख्य व योग या पांचांचाहि त्यांत समावेश होतो म्हणून त्यास पांचरात्रधर्म हें नांव मिळाले आहे” (मभा.शां. ३३९.१०७), आणि “वेदारण्यकासुद्धां (अर्थात् उपनिषदांसुद्धां) हीं सर्व (शास्ने) परस्परांची अंगें होत” (शां. ३४८. ८२), असें म्हटले आह. ‘पांचरात्र’ शब्दाची ही निरुक्ति व्याकरणरीत्या शुद्ध नसलैो तरी सर्व प्रकारच्या ज्ञानाची एकवाक्यता भागवतधर्मात आरंभीच केलेली होती एवढे त्यावरून स्पष्ट होते. तथापि भक्तीचा इतर सर्व धर्मागांशी एकवाक्यता करणें हाहि कांहीं भागवतधमीचा प्रमुख विशेष नव्हे. भक्तीचे धर्मतत्त्व भागवतधमानेच प्रथम प्रवृत्त केले असें नाही. रुद्राची किंवा विष्णूच्या कोणत्या तरी स्वरूपाची भक्ति भागवतधर्म निघण्यापूर्वीच सुरू झालेलीं होती, आणि उपास्य कोणतेंहि असले तरी तें ब्रह्माचेच प्रतीक किंवा एक प्रकारचे रूप होय ही कल्पनाहि पूर्वीच निघालेली होती, असें मैत्र्युपनिषदांतील वर दिलेल्या वाक्यांवरून (मैत्र्यु. ७.७) उघड होतें. रुद्रादि उपास्याऐवजीं वासुदेव हें उपास्य भागवतधर्मात घेतले आहं खरें; पण त्याचबरोबर भक्ति कोणाचीहि