पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ ६ गीतारहस्य अथवा कर्मयेाग-परिशिष्ट प्राचीन दिसत नाहीं, एवढ्यावरून सर्वच उपनिषदें बुद्धापूर्वी चारपांचशें वर्षांहून प्राचीन नसावीत असें कित्येकांनी अनुमान केले आह. परंतु कालनिणयाच्या वरील रीतीप्रमाणें पाहिले तर ही समजूत चुकीची आहे असें आढळून येईल. ज्योतिषरीत्या सर्वच उपनिषदांचा काल निश्चित करिता येत नाही हें खरें. तथापि मुख्य मुख्य उपनिषदांचा काल ठराविण्यास या रीतीचा चांगला उपयोग होतो. भाषेच्या दृष्टीनें पाहिलेंतर मैत्र्युपनिषत् पाणिनीपेक्षांहि प्राचीन आहे, असें प्रो. मॅक्समुल्लर यांनी म्हटले आहे.* कारण या उपनिषदांत मत्रायणी संहितंतच आढळून येणार व पाणिनीच्या वेळी प्रचारांतून गेलेले म्हणजे छांदस असे पुष्कळ शब्दसंधि आले आहेत. पणु मैत्रायण्युपनिपत् हें कांही सर्वात पहिलें म्हणजे अतिप्राचीन उपनिषत् नव्हे. मैत्रायण्युनिषदांत त्रह्मज्ञान व सांख्य यांची जोड घालून दिली आहे, इतकंच नव्हे तर ठिकठिकाणी छांदोग्यू, वृहदुरण्यक, तैत्तिरीय, कठ आणि ईशावास्य या उपनिषदांतील वाक्यें अगर श्लोकहि मैत्र्युपनिषदांत प्रमाणार्थ घेतलेले आहेत. या उपनिषदांचीं प्रत्यक्ष नांवे भत्र्युपनिषदांत दिलेली नाहीत. तथापि हीं वाक्यें देताना तत्पूर्वी “एवं ह्याह” किंवा ‘उत्तं च' (=असें म्हटले आहे), अशी परवाक्यदर्शक पदें घातलेली असल्यामुळे तीं वाक्यं दुस-या ग्रंथांतील होत. मैत्र्युपनिपत्कारांची स्वत:चा नव्हेत, याबद्दल शंका रहात नाही: आणि ती कोठली आहेत हैं इतर उपनिषदें पाहून सहूज़ ठरावतां यतें. आतां या मैत्र्युपनिषदांत कालरूपी किंवा संवत्सररूपी ब्रह्माचे विवेचन चालू असतां (मैत्र्यू ६.१४)“मघा नक्षत्राच्या आरभापासून क्रूमानें श्रविष्टा म्हणजे धनिष्ठा नक्षत्राच्या अध्या भागावर येईपर्यंत (मघाद्यं श्रविष्टाधे) दक्षिणायन होतें: आणि सार्प म्हणजे आश्रेषा नक्षत्रापासून उलट क्रमाने, म्हणजे अा'टेपा, पुष्य, इत्यादि प्रकारें, मार्गे मोजीत धनिष्ठा नक्षत्राच्या अध्या भागापर्यत उत्तरायण होतें;” असे वर्णन आहे. ही उदगयनस्थितिदशैक वचनें तत्कालीन उदगयनस्थितीसच अनुलश्वन असली पाहिजेत हें उघड आह; व मग त्यावरून या टपनेिपदाचा कालनिर्णयहि गणितरीत्या सहज होऊं शकतो. पण त्याचा अशा दृष्टीनें कोणीं विचार केल्याचे दिसत नाहीं. मैत्र्युपनिषदांत वर्णिलेली ही उदगयनस्थिति वेदांगज्योतिषांतील उदगयनस्थितीच्या पूर्वीची आहे. कारण, वेदांगज्योतिषांत उदगयनाचा आरंभ धनिष्ठा नक्षत्राच्या आरंभापासून होतो असें स्वच्छ म्हटलें आहुः व मैत्र्युपनिषदांतला आरंभ ‘धनिष्ठार्धा'पासून अंहे. मैत्र्युपनिषदांतील ‘श्रविष्टाधै' या शब्दांत ‘अर्धे' असें जें पद आहे त्याचा अर्थ ‘बरोबर निम्मे' असा धरावा किवा “धनिष्ठा व शततारका यांच्या दरम्यान

  • See Sacred Books of the East Series, Vol. XV. Intro.pp Xlvill-lm.