पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४--भागवतधमीचा उदय व गीता وی که ها कोठे तरी” असा करावा, याबद्दल मतभेद आहे. पण कांहीं म्हटलें तरी वेदांगज्योतिषाच्या पूर्वीचीउदगयनस्थिति मैत्र्युपनिषदांत वर्णिली आहे,व तीच तत्कालची स्थिति असावी, याबद्दल शंका रहात नाही. म्हणून वेदांगज्योतिषकालचे उदगयन मैत्र्युपनिषत्कालीन उदगयनापेक्षां सुमारें अध्या नक्षत्रानें मागें आले होतें असे म्हटले पाहिजे. वेदांगज्योतिषांतील उदगयनस्थिति इसवी सनापूर्वी सुमारें 1२०० किंवा १ ४०० वर्षाची आहे असें ज्योतिर्गणितावरून सिद्ध होतें;* आणि उदगयन अध्यां नक्षत्रोनें मार्गे पडण्यास सुमारं ४८० वर्ष लागतात म्हणून मैत्र्युपनिषत् ख्रिस्तापूर्वी १८८० ते १६८० वर्षाच्या दरम्यान केव्हां तरी झाले असावें असें गणितानें निष्पन्न होतें. निदानपक्षीं हें उपनिषत् वेदांगज्योतिषाच्या पूर्वीचे आहे याबद्दल कांहीच शंका रहात नाहीं. छांदोग्यादि ज्या उपनिषदांचे उतारे मैत्र्युपनिषदांत घेतले आहत तीं याहिपेक्षां प्राचीन आहेत हें आतां सांगावयास नको. ऋग्वेद (इ.स.पूर्वी सुमारें ४५००),यज्ञयागादिपर ब्राह्मण (इ.स.पूर्वी सुमारें २५००), आणि छांदोग्यादि ज्ञानपर उपनिषदें (इ.स. पूर्वी सुमारें १६००वर्षे), याप्रमाणे या ग्रंथांच्या कोलाचा निर्णय झाल्यावर ज्या कारणासाठी भागवतधर्माच्या उदयाचा काल पाश्चात्य पंडित अलीकडे ओढितात तें शिल्लक न रहातां, श्रीकृष्ण व भागवतधर्म या गायवासरांची नैसर्गिक जोडी एकाच कालरज्जूनें बांधून ठेविण्यास कसलीच भीति रहात नाही; अणि मग बौद्ध ग्रंथकारांना वर्णिलेल्या किंवा इतर ऐतिहासेक वस्तुस्थितीशीहि नीट मेळ बसतो. वैदिक काल संपून सूत्रे व स्मृति यांच्या कालास याच सुमारास आरंभ झालेला आहे. भागवतधर्माचा उदय ख्रिस्तापूर्वी सुमारं १४०० म्हणजे बुद्धापूर्वी सुमारें सातआठशें वर्ष झालेला आहे, असें वरील कालगणनेवरून स्पष्ट होते. हा काल बराच प्राचीन आहे; तथापि ब्राह्मणग्रंथांतील कर्ममार्गे यापेक्षांहि प्राचीन असून उपनिषदांतील व सांख्यशास्रांतील ज्ञानहि भागवतधर्म निघण्यापूर्वीच प्रचलित होऊन सर्वमान्य झालेलें होतें हें वर सांगितलें आहे. अशा वेळीं या ज्ञानाची अगर धमोगांची अपेक्षां न ठेवितां श्रीकृष्णासारखा चतुर वज्ञानी पुरुष आपला धर्म प्रवृत्त करील किंवा त्यानें केला असला, तरी तो तत्कालीन राजर्षींस व ब्रह्मर्षीस मान्य होऊन लोकांत प्रसृत झाला असेल, अशी कल्पना करणें आमच्या मतें सर्वथैव अयोग्य होय. ख्रिस्तानें आपल्या भक्तिपर धमीचा ज्या यहुदा लोकांत प्रथम

  • वेदांगज्योतिषाच्या कालाबद्दलचे विवेचन आमच्या 2rro” (ओरायन) नृां वाच्या इंग्रजी ग्रथांत आणि मराठींत कै. शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्या “भारतीय ज्योति:शास्राच्या इतिहासांत’ (पृ.८७-९४ व १२७-१३९ ) आहे तें पहुा. त्यांतच उदगयनावरून वैदिक ग्रंथांचा काल कोणता ठरतो याचाहि विचार केलेला आहे.