पान:गाव झिजत आहे.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला आहे. काही गावांतून तर बैलांचे कामच संपत आले आहे. गावांतीलबैलगाड्यांची संख्या कमी झाली. शेतमाल वाहतुकीसाठी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आले.यातून वाहतूक करणे सर्वांनाच सोयीचे होऊ लागले. त्यामुळेही अशा जनावरांकडेदुर्लक्ष झाले. घोड्यांची संख्या कमी होत आहे. कारण ड्यांच्याऐवजी सायकल,मोटरसायकल, जीप या वाहनांचा वापर वाढला. एकूणच जनावरांची उपयोगिता कमी

झाली. म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले.

माणूस सर्वांत स्वार्थी प्राणी आहे. एखाद्या वस्तूचा, प्राण्याचा उपयोग संपलाकी त्याकडे तो दुर्लक्ष करतो. जनावरांशिवाय शेती, वाहतूक करता येते आणि तीहीकमी वेळात कमी श्रमात असे लक्षात आल्यामुळे खेडेगावातून जनावरांची संख्या कमी

जनावरांकडे होणारे दुर्लक्ष कृषी उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.यापुढच्या काळात सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादनासाठीझाला पाहिजे. तरच आपली शेती टिकून राहील असे कृषिशास्त्रज्ञांना वाटते. शासनानेसुद्धा सेंद्रिय खताच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले आहे. सेंद्रिय खताचे उत्पादन वाढावेम्हणून अनेक योजना, प्रकल्प आखले जात आहेत. गांडूळ शेतीचा उच्चारकेल्याशिवाय एकही कृषिपरिषद पूर्ण होत नाही. एवढे महत्व गांडूळ खताला दिले गेलेआहे. सेंद्रिय खताचे महत्त्व यापुढच्या काळात खरोखरच वाढणार असेल तरजनावरांच्या वाढीचा विचार करावाच लागेल, कारण गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी,घोडा, डुक्कर हे सर्व प्राणी सेंद्रिय खत निर्माण करणारे छोटे-छोटे कारखानेच आहेत. याप्राण्यांचा शेती करण्यासाठी उपयोग घ्या अथवा न घ्या! सेंद्रिय खताचा चालता-फिरता छोटा कारखाना म्हणून त्याचा विचार करावा लागेल. सेंद्रिय खत निसर्गातील अनेकगोष्टींचा उपयोग करून तयार करता येतो हे सांगण्याची आता गरज नाही. जनावरांद्वारेहोणारी शेणखताची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीची आहे. म्हणून शेण किंवाविष्ठा देणाऱ्या प्राण्याला यापुढच्या काळात जपावे लागणार आहे. शेतीसाठी नत्र, स्फुरद आणि पलाश या घटकांची नितांत गरज आहे असे कृषीशास्त्रज्ञ सांगतात. हे सर्व घटक कमीजास्त प्रमाणात जनावरांच्या मलमूत्रात उपलब्धआहेत. शेतकऱ्याला पूर्वीप्रमाणेच मलमुत्रात आयते तयार झालेले नत्र, स्फुरद आणिपलाशचे मिश्रण पुन्हा वापरावे लागेल.यंत्रे आली-जनावरे कमी झाली / ८५