पान:गाव झिजत आहे.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाय ही हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते. गायीच्या पोटात तेहेतीस कोटी देववास करतात असे मी लहानपणी ऐकले होते. देव असतात की नाही, गाय पूजनीय आहेकी नाही या फंदात पडण्याची गरज नाही. मात्र गावरान गाय मानवहितासाठी सप्तशक्तींचेआगर आहे असे मला वाटते. कारण गायींचे दूध औषधी, गायीचे तूप औषधी,गायीच्या मुत्राला तर आयुर्वेदात खूप मोठे स्थान आहे. अनेक आयुर्वेदिक औषधेगायीच्या मुत्राचा उपयोग करून तयार केली जातात. गायीचे शेण उत्तम सेंद्रिय खतआहे. गायीच्या कातडीचा उपयोग अनेक वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. हाडेआणि शिंगांचा वापर खतनिर्मितीसाठी होतो. म्हणूनच गाय पूर्वजांनी पूजनीय मानलीआहे. जसे गायीचे तसे शेळीचे. शेळीच्या दुधाचा वापर आरोग्यवर्धक असतो, म.गांधींनी शेळीला व तिच्या दुधाला महत्त्व दिले होते ते यामुळेच. हे सर्व प्राणी मानवालाउपयोगी पडणारे आहेत. यंत्र युग अवतरले असले तरी या प्राण्यांना दूर करून चालणार नाही. कारण ग्रामवासीयांचे ते खरे मित्र आहेत. पर्यावरणाचे रक्षक आहेत.८६ / गाव झिजत आहे.