पान:गाव झिजत आहे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपयोगात आणले जात होते. ही जनावरे म्हणजे त्यागाचे उत्तम प्रतीकच! ग्रामीणभागातील लोकांसाठी जनावरांएवढा त्याग इतर कोणी केला असेल असे वाटत नाही.लोकसंख्या वाढली त्यामुळे अन्नाची मागणी वाढली.  ही मागणी पूर्णकरण्याकरिता शेतीतील धान्याचे उत्पादन वाढविणे गरजेचे होते. शेणखत, मूत्रापासून हेशक्य नाही असे कृषी तज्ज्ञांना वाटले म्हणून त्यांनी रासायनिक खताचा वापर करण्याचीसवय शेतकन्यांना लावली. खत, मूत्र,पालापाचोळा यापेक्षा रासायनिक खताच्यावापरामुळे काही काळ उत्पादन वाढले. पण हे वाढत असतानाच खताच्या मात्राहीवाढवाव्या लागल्या. १५:१५:१० हे खत दोन वर्षे ज्यांनी वापरले त्याला तिसऱ्या-चौथ्या वर्षांपूर्वी इतकेच उत्पादन घेण्यासाठी १८:१८:१० नंतर २०:२०:० चा डोसवापरावा लागला. पुढे हा डोस वाढतच गेला मग २३:२३:०, १८:४६ आणि आता १०:२६:२६ असा वाढत्या प्रमाणात खताचा वापर करूनदेखील हवे तेवढे उत्पादनवाढेल याची खात्री नाही. उलट जमिनीचा कस यामुळे कमी होत आहे. जमीन नापीकहोत आहे. या रासायनिक खतांचा अंश पाण्यात उतरत आहे. पाणी दूषित होत आहे.त्याचा परिणाम मानवी शरीरावर दिसू लागला आहे. रासायनिक खताच्या उत्पादितअन्नधान्यातून आणि पाण्यातून मानवी शरीरात विष पेरले जात आहे, अशी चर्चाअलीकडे मोठ्या प्रमाणात देशभर सुरू झाली आहे.म्हणून आता पुन्हा सेंद्रिय शेतीचे भजन' कृषी तज्ज्ञांनी सुरू केले आहे. अर्थातराजकीय धोरणाच्या पाठिंब्याशिवाय अशा भजनांना अर्थच नसतो. शेती वाचवायचीअसेल तर सेंद्रिय खताला पर्यायच नाही असा गजर राजकारण्यांनी सुद्धा सुरू केलाआहे. या पार्श्वभूमीवर जनावरांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.शेतीत यंत्रसामुग्रीचा वापर वाढला आणि हळूहळू जनावरांच्या संवर्धनाकडेदुर्लक्ष होत गेले. बैलांचा वापर कमी झाला. त्यांची संख्या कमी झाली. म्हैस, गायींचीसंख्याही रोडावली. शेळ्या-मेंढ्या सांभाळणे गोरगरीबांना न परवडणारे झाले.खुरपणी, निंदणी, कापणी इत्यादी कामांसाठी शेतात जाताना शेतमजूर बरोबर त्याचीगाय, म्हैस, शेळी घेऊन जात असे. जनावर बांधावरल्या एखाद्या झुडपाला बांधले जाई.कामाची त्याला मजुरी मिळत होती. जनावर फुकट चरून निघत होते. आता शेतीतीलसर्व कामांसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. त्यामुळे मजुरांचे शेतीतील मजुरीचे दिवसकमी झाले आहेत. मजुरीबरोबर त्याने सांभाळलेल्या जनावरांचे बांधावर चरणे आता अवघड झाले आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांकडील बैल बारदाना देखील कमी८४ / गाव झिजत आहे