पान:गाव झिजत आहे.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला, की तो शेतकरी रब्बीचे पीक घेऊ लागला. त्याचे उत्पन्न दुप्पट झाले आणिबघता-बघता दारिद्रयाची रेषा त्या कुटुंबापासून दूर झाली .ग्रामीण भागासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांना कमीत कमी रब्बीच्या सीझनसाठीअर्धा किंवा एक हेक्टरला पाणी मिळावे अशी योजना करणे गरजेचे आहे. तरच तोगावात स्थिरावेल. १०० टक्के शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय होणे अशक्य आहे, पणधरणातील पाण्याच्या वापरावर बंधन आणले आणि रब्बीसाठी मोजून पाणी दिले तरगावातील जास्त कुटुंबांचा फायदा होईल. यामुळे सिंचनक्षेत्र फारसे वाढणार नसलेतरीही सिंचनाचा फायदा होणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढेल. पाण्याचा जास्तीत जास्तशेतकऱ्यांना फायदा होईल. दोन-पाच टक्के कुटुंबांकडे केंद्रित झालेले पाणी इतर अनेककुटुंबांच्या घरात जाईल. त्यांच्या दारिद्रयाचे दशावतार थांबतील.  कोरडवाहू शेतकऱ्याला दारिद्रयातून मुक्त करण्यासाठी पाण्याव्यतिरिक्तआणखीन काही उपाय योजावे लागतील. ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांना पाण्याचा लाभहोणार नाही अशांना शेतीपूरक जोडधंदा करण्यास मदत केली पाहिजे. म्हैस, गाय,शेळीपालन हा उत्पन्नवाढीसाठी पूरकधंदा आहे. ज्यांना हे करणे शक्य होणार नाहीत्यांना कुक्कुटपालन, वराहपालन अशा जोडधंद्यांत गुंतविले तर त्यांना कोडवाहू शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे दुसरे साधन मिळेल. त्यांचे गाव सोडून जाणे थांबेल.एकराचा मालक असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील एकरी सरासरी उत्पन्न आणिकोरडवाहू छोट्या शेतकऱ्याच्या शेतातील एकरी उत्पन्न यात खूपच तफावत आहे.छोट्या शेतकऱ्याचे एकरी उत्पन्न मोठ्या शेतकऱ्यांपेक्षा निश्चित जास्त आहे. अशाकोरडवाहू शेतकऱ्याला रब्बीच्या एका पिकासाठी जास्तीत जास्त एक हेक्टरसाठी पाणीमिळाले किंवा ज्यांना पाणी मिळाणे शक्य नाही त्यांना जोडधंद्यासाठी मदत मिळाली तरत्यांचे संसार सुखाचे होतील. गाव सोडून शहरात जाऊन श्रम विकण्याची त्यांच्यावरपाळी येणार नाही.शहर असो किंवा खेडेगाव असो एकाच कुटुंबात उत्पन्नाची अनेक साधनेएकवटलेली दिसतात. याचाही परिणाम ग्रामीण दारिद्य वाढीवर झाला आहे. गावातकोणीतरी एक श्रीमंत असतो. त्याच्याच घरात पिठाची गिरणी किंवा हालर असते. त्याच्याकडे ट्रक किंवा ट्रॅक्टर असतो. त्याचेच किराणा दुकान असते. त्याच्याचघरातला कोणीतरी नोकरीला असतो. शिवाय तोच गावात ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा, एक कुटुंब-एक उत्पन्नाचे साधन / ५५