पान:गाव झिजत आहे.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशाच प्रकारचे पद भूषविणारा असतो. तोच सोसायटीचा चेअरमन असतो. अशीउत्पन्नाची आणि प्रतिष्ठेची अनेक साधने इतर कुटुंबांकडे कशी वळतील याचा विचारझाला पाहिजे. नाहीतर राव तुपाशी आणि गाव उपाशी अशी धोकादायक परिस्थितीनिर्माण होईल. त्याची सध्या सुरवात झाली आहे. कोरडवाहू शेतकरी कर्जबाजारी झालाआहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या यातूनच होत आहेत. म्हणून ग्रामपंचायत कायद्यात किंवा घटनेतच बदल करून ‘एक कुटुंब-एक उत्पन्नाचे साधन' असे काहीतरी केलेपाहिजे. म्हणजे एकाच कुटुंबाच्या हातात केंद्रित झालेली आर्थिक आणि राजकीय सत्ताविकेंद्रित होईल. याचा गावातील अनेक कुटुंबांची संख्या सहज दोन-पाच टक्के आहे.‘एक कुटुंब-एक उत्पन्नाचे साधन' हा न्याय गावात अंमलात आला तर तो दारिद्रयाच्याउंबरठ्यावर असलेल्या ५० टक्के कुटुंबांना जगण्यासाठीचा मोठा आधार होईल.शोषणाची ही प्रक्रिया अनंत काळापासून चालत आलेली आहे. त्यात बदल होणारनाही असे काहींना वाटत असेल तर ते रक्तरंजित क्रांतीला आमंत्रित करीत आहेत असेम्हणावे लागेल. अनेक अंगाने गावाची होणारी झीज उत्पन्नवाढीचे पर्याय देऊनथांबवावी लागेल तरच गावात स्वराज्य येईल. . ५६ / गाव झिजत आहे