पान:गांव-गाडा.pdf/95

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४      गांव-गाडा.


हाडकी, हाडोळा इनाम जमिनी किंवा बलुतें आहे अशांपैकी काहीजण, सरकार कमेटीकडे नोकरीला देते,व त्यांनी तिचे हुकमतीखालीं गांव सफा करण्याचे काम करावयाचे असते. स्वच्छ व पुरेसा पाण्याचा पुरवठा, रस्ते, व सहान ( खुल्या ) जागा झाडणे, व सर्व घाण दूर नेणे, ही व असली लोकांच्या आरोग्यास जरूर ती कामें कमेटीने करावयाची असतात. त्याबद्दल ती नियम ठरविते आणि ते मोडणारांना गांवावर अधिकार असलेल्या मॅजिस्ट्रेटच्या अध्यक्षतेखाली दंड करते. ह्या दंडाची रक्कम कमेटीला मिळते. खेड्यांतील आरोग्याच्या व पाणीपुरवठ्याच्या कामाला पैशाची मदत करण्याबद्दल हिंदुस्थानसरकारने स्थानिक सरकारांला फर्माविले आहे. ह्यासंबंधानें कोणती विशेष कामें करावयाची हे ठरविण्याच्या कामी कलेक्टरला आरोग्यखात्याच्या अधिकाऱ्यांची सल्ला मिळते. खेड्यांतील आरोग्य सुधारण्यासाठी मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल फंड निघाला असून त्याचे विद्यमाने वडाळे व कार्ले येथे नमुन्यादाखल प्रयोग चालू आहेत. म्युनिसिपालिट्या, लोकलबोर्डे, सॅॅनिटरी-कमेट्या वगैरे संस्था स्थानिक करांवर चालतात. कर देणारांच्या तंत्राने त्या चालविल्या म्हणजे पैशाचा व्यवस्थित उपयोग होईल, आणि सार्वजनिक कामें अंगावर घेऊन करण्याची सामान्य जनतेला संधि लाभल्याने त्यांना राजनीतीची संथा मिळेल, असा ह्या संस्था निर्माण करण्यांत सरकारचा आद्य हेतु आहे. तो सफल होणे लोकांच्या दक्षतेवर, प्रामाणिकपणावर, व स्वार्थत्यागावर अवलंबून आहे.

 तालुका सोडून आपण खेड्यांत आलों म्हणजे, वतनी नोकरी दिसावयाला लागते. पाटील, कुळकर्णी, महार व जागले हे खेड्यांतले वतनदार सरकारी गांव-नौकर होत. ह्यांपैकी महार, जागले ह्यांचे पोट बहुतांशी रयतेकड़न मिळणाऱ्या बलुत्यांवर व दुसरे हक्कांवर चालत असल्यामुळे त्यांना वेतनी वतनदार म्हणण्यापेक्षा बलुतदार वतनदार म्हणणे रास्त दिसते. इंग्रजीत पाटील-कुळकर्ण्यांना बलुतें नसून फक्त मुशाहिरा आहे. तेव्हां ते वेतनी वतनदार आहेत आणि त्यांचाच विचार ह्या प्रकरणांत करण्याचे