पान:गांव-गाडा.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४      गांव-गाडा.


देशमुख, देशपांडे व पाटील-कुळकर्णी ह्यांच्या
हक्क-अमलांची टिपणे.

 देशमुखी अमल व बाबती:-शिरपाव (जमाबंदीचे कतबे होतील तेव्हां ). हक्क रुसूम (दरसाल दरोबस्त येत आहे त्यापैकी निमे). बरो ( दरोबस्त पैकी निमे ). भेट. कारकुनी. फुरमासीची कलमें १२-बकरें, गांव निसबत दरसाल. तूप. राबता महार, महारांकडील दरसाल. जोडा चर्मी, चांभारांकडील. आघोड (जनावराचें सबंध कातडें . माल डबा, लोहारांकडील. झूल भुरकी, धनगरांकडील व साळयांकडील. शेव साबणी हरजिनसी. सायरपैकी जमेदारी. संक्रांतीचे तीळ-गूळ, ऊंस वगैरे. मोळी, महारांकडील दर सणास. मांगांकडील आघाडी पिछाडी.

 देशपांडे अमल व बाबती:-देशपांडपण परगणे मजकूर देहे २९. इनाम जमीन मौजे +++ येथें चाहूर २. दरोबस्त पैकी २ हिस्से देशमुख, तिसरा हिस्सा आमचा. नगदीबाब रु. ७४७/:- ५७६।।. हक्क दर चाहुरी , १ रुपाया प्रमाणे देहे २९ चाहूर ६५०।। पैकी वजा कसबे मजकूर ७४ बाकी चाहर ५७६।। ५६ दसरा, तूप देहे २८ दर गांवास २ प्रमाणे कसबा खेरीज. १०० शिरपाव जमाबंदीसमयी सरकार पोत्यांपैकी. १५ जकातीवर हक्क ऐन १०, डबी ५. वरोचें अनाज दर चाहुरी कैली ८८२ प्रमाणे सोळोले कैली लावणीचे आकाराप्रमाणे, चांभारांकडील चर्मी जोडे दर गांवास दरसाल २ प्रमाणे, व हयात तोबरा आणीन सालांत दर गांवास एकादे लागल्यास पाळीप्रमाणे. संक्रांतीस हुर्डा पेंढी दर गांवास १ प्रमाणे. पंडेवलाचे कवाड कणसाळे दर गांवास १ प्रमाणे. महारांकडून सरपण दर गांवास दर सणास मोळ्या २ प्रमाणे. दर सालास सण ५. लग्न मुंज वगैरे शुभकार्य जाहल्यास आहेर फरमास गांव पाहून घेण्याचे आहे, माहिज नाही. दुखोट्याचे समयीं दुखोटा घेण्याचे आहे, माहिज नाही. मळे ज्या गांवीं भारी असतील तेथें मळ्याचे पीक पाहून जोड व मिर्च्या दोन मण घेण्याचे आहे. राबता महार दर गांवास अनुक्रमें. काही पोटास आडशेरी देऊन काम घेण्याचे आहे. यात्रा व लग्न मुंज झाल्यास बैल घोडी व बिगारी माणसे गांव पाहून एक दोन आणवण्याचे आहे. गांवगन्ना हरएक कामास खासा अगर कारकून अथवा माणस गेलें त्यास भोजनखर्च दाणा वैरण गांवखर्ची गांवकरी यांनी देण्याचे आहे. कडबा