पान:गांव-गाडा.pdf/84

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ६५


थोटणा गांव पाहून दर गांवास कोठं शंभर, कोठं दोनशें गांवापासून घेऊन गांवकरी यांनीं देण्याचे आहे. कसबे मजकूरचे पेठेत आंब्यांचीं ओझीं येतील त्यांस दर ओझ्यास आंबे सुमारें ५ घेण्याचें आहे. पेठा कसचे मजकुरीं होतील त्यांस दर पेठेस, कोट्यांकडील पासोडा १ प्रमाणें कुल मागांस. सनगराचे कुल मागांस कांबळा १ प्रमाणें. कसबे मजकुरीं तांबोळी याचे दर दुकानास दररोज पान सुमारे १० प्रमाणें. लग्न, पाट, मागणी, जागरण वगैरे कार्य कोणाचे घरीं होईल त्यानें विडा आणून देऊन परवानगी न्यावी. सरकारचा विडा तसरीफ देशमुखाचे मार्गे. शिराळशेटीस खोबरें कसब्याचें गांवखर्ची वजन ४ - मळे ज्या गांवीं भारी असतील तेथें मका लाविल्यास दर फडास कणसें पन्नास पंचवीस फड पाहून. उंसाचे थळास रसाची घागर १ व उंसांची १ मोळी. वतनदारीचा वाद विल्हस लागल्यास कागदपत्र जाहल्यास शेला पागोटे काम पाहून. सरकारी कामाकरितां गांव सोडून कोठं जाणे येणे झाल्यास खर्च होईल त्याची बरगत तालुक्यावर. कापड, भूस, किंराणा, जनावरें वगैरे खरीदी अगर विक्री अथवा परगांवाहून शेत खोतीहून आणल्यास परगांवास नेल्यास जकातदारानें हाशील घेऊ नये. बलुत्ये, सुतार, लोहार वगेरे ज्याचें काम लागेल त्यानें करावे, मजुरी मागू नये.

 पाटीलकी हक व बाबती-मानपान व उत्पन्न. दरोबस्त सरकारचे मान २-नांगर ; भेट दिव्यांत ठेवणें. आधींचे मान सरकाराचे ३-शिरपाव: विडा; दसऱ्याचें वाजविणें. बरोबरीचे मान ४-होळीस पोळी, पोळ्याचे बैल शिराळशेट, गौर. कित्ता मान १५ व उत्पन्नापैकी निमे सरकार व निमे पाटील याप्रमाणे बीतपशील-फळाचा वांटा; दसऱ्याचें बकरें, तेलाचे घाण्यास तेल दररोज नऊ टांक; पट्टी पासोडीचे रुपये ५ पांच, शेलपाटी दर निवड्यास गल्ला कैली तीन पायली; दर गुऱ्हाळास गुळाची ढेप एक, रसाची घागर एक, ऊंस दररोज अडीच-प्रमाणें आठ रोज वीस; साळ्याचे दर मागास पासोडी एक, धनगराचे दर मागास चवाळे एक, राबता दर एक महार महिने सहा; तांबोळ्यांकडील पानें दररोज तेरा दर दुकानास; मुहूर्ताचा शेला; शेव साबणी, कोळ्यांचें पाणी दररोज घागरी चार; चांभारांकडील जोड दोन; महारांकडील कातडीं. मागाहूनचे मान ४-नांव; टिळा; दिवाळीचें वाजविणें, तोरण व गेरू एकूण २८. घर ठिकाण सरकार निमे पाटीलकीची जागा.